Download App

Shah Rukh Khan: किंग खानचं ट्वीट अन् स्विगीची मन्नत बाहेर डिलिव्हरी? नेमकं काय आहे प्रकरण… 

  • Written By: Last Updated:

Shah Rukh Khan: बॉलिवूडचा बादशाह अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) म्हणजेच सर्वांचा लाडका किंग खान हा ट्विटरवर अनेक वेळा चाहत्यांच्या सवालांची उत्तरं देत असतो. आस्क एस आर के (#AskSRK) या हॅश टॅगचा वापर करुन काही चाहते किंग खानाला मजेशीर प्रश्न विचारत असतात. (social media) नुकताच ट्वीटरवर किंग खानला एका चाहत्याने ,”भावा जेवलास का?” (King Khan) असा सवाल त्याला विचारला होता. त्याच सवालाला किंग खानने भन्नाट उत्तर दिले आहे.

किंग खानच्या त्या उत्तरानंतर स्विगीचे काही डिलिव्हरी बॉइज मन्नत बाहेर येऊन पोहोचले होते. तसेच ट्वीटरवर किंग खानला एका चाहत्याने, “भावा जेवलास का?” असा प्रश्न विचारला होता. या सवालाला किंग खानाला उत्तर देत म्हणाला की, ‘भावा तू स्विगीमध्ये काम करतो का? पाठवशील का?” किंग खानच्या या उत्तराने अनेक चाहत्यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर स्विगी कंपनीने किंग खानाला ट्वीटला रिप्लाय दिला होता, “आम्ही स्विगीमध्ये आहोत. पाठवू का?”

परंतु आता स्विगी कंपनीने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी कॅप्शन देखील दिले आहे, ‘हम स्विगी वाले है और हम डिनर लेके आगाये’. स्विगी कंपनीच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये दिसत आहे की, ७ डिलिव्हरी बॉइज हे मन्नत बाहेर येऊन उभे आहेत. स्विगी कंपनीच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आस्क एसआकरेच्या दरम्यान एका चाहत्याने किंग खानाला सिगारेट कायमची सोडली का? असा सवाल विचारला.

या सवालावर उत्तर देत किंग खान म्हणाला,”हा.. मी खोटं बोललो… मी त्या कॅन्सर स्टिकच्या आहारी गेलो आहे. किंग खानचे लवकरच जवान आणि डंकी या सिनेमामधून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. त्याच्या आगामी सिनेमांची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहात आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी किंग खानचा पठाण हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. या सिनेमात किंग खानसोबतच, दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) यांच्याबरोबर डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.

Tags

follow us