Pathan : शाहरुखचा पठानची 1000 कोटींच्या पुढे वाटचाल सुरू…

मुंबई : सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित यशराज फिल्म्सचा ‘पठान’ (Pathan) या सिनेमाने देशात आणि परदेशात बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी केली आहे. या सिनेमाने जगभरता आजपर्यंत 1006 कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमाने 1000 कोटींच्या पुढे वाटचाल सुरू केली आहे. या सिनेमात शाहरुख खान ( Shahrukh Khan ) मुख्य भूमिकेत आहे. चौथ्या रविवारी ‘पठान’ने बॉक्स ऑफिसवर पुन्हा […]

Pathan Cast Fee Revealed Deepika Padukone Shah Rukh Khan John Abraham Takes Home Massive Paycheck 001

Pathan Cast Fee Revealed Deepika Padukone Shah Rukh Khan John Abraham Takes Home Massive Paycheck 001

मुंबई : सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित यशराज फिल्म्सचा ‘पठान’ (Pathan) या सिनेमाने देशात आणि परदेशात बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी केली आहे. या सिनेमाने जगभरता आजपर्यंत 1006 कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमाने 1000 कोटींच्या पुढे वाटचाल सुरू केली आहे. या सिनेमात शाहरुख खान ( Shahrukh Khan ) मुख्य भूमिकेत आहे.

चौथ्या रविवारी ‘पठान’ने बॉक्स ऑफिसवर पुन्हा दमदार झेप घेतली. त्यानंतर आता बुधवारी म्हणजा आठवड्याच्या मध्यावर या चित्रपटाने भारतात 1.08 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘पठान’ने आता एकट्या परदेशात 46.15 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली आहे, तर भारतात नेट कलेक्शन 519.14 कोटी एवढे आहे. पठाण सिनेमाची जगभरातील एकूण कमाई 1006 कोटी एवढी आहे. त्यापैकी भारतामध्ये 627 कोटी तर परदेशात 379 कोटींची कमाई केली आहे.

Prashant Damale : मराठी रंगभूमीसाठी भाग्याचा दिवस, प्रशांत दामलेंना ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’

पठान आता हिंदी सिनेमाच्या इतिहासात जगभरात सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट आहे. याचबरोबर वायआरएफच्या स्पाय युनिव्हर्सचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट देखील आहे. या सिनेमात जॉन अब्राहम, दीपिका पदुकोन हे कलाकार देखील प्रमुख भूमिकते आहेत.

दरम्यान या सिनेमावरुन सुरुवातील वादंग पेटले होते. दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकनीवरुन अनेकांनी या सिनेमाला विरोध केला होता. यानंतर सिनेमात बदल करण्यात आला. सिनेमामध्ये बदल केल्यानंतर हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता.

Exit mobile version