Shefali Jariwala : तरुण दिसण्यासाठी…; शेफालीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी काय सांगितलं?

Shefali Jariwala Death :  बॉलीवूड अभिनेत्री शेफाली जरीवालाचं हृदयविकाराच्या झटक्याने शनिवारी रात्री निधन झाला आहे. वयाच्या 42 व्या शेफालीने

Shefali Jariwala Death

Shefali Jariwala Death

Shefali Jariwala Death :  बॉलीवूड अभिनेत्री शेफाली जरीवालाचं हृदयविकाराच्या झटक्याने शनिवारी रात्री निधन झाला आहे. वयाच्या 42 व्या शेफालीने आखेरचा (Shefali Jariwala Death) श्वास घेतला. शेफाली सोशल मीडियावर ‘काटा लगा गर्ल’ म्हणून प्रसिद्ध होती. ती गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमध्ये (Bollywood) फारशी सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. त्यामुळे तिच्या जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

तर आता एक धक्कादाय माहिती समोर आली आहे. शेफाली गेल्या 6-7 वर्षांपासून तरुण दिसण्यासाठी उपचार घेत होती अशी माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, ती विटामीन सी आणि ग्लुटाथिओन नावाच्या औषधांचे डोस घेत होती. तरुण दिसण्यासाठी आणि त्वचेसाठी ती या औषधांचे डोस घेत होती अशी माहिती देखील समोर आली आहे. मात्र या उपचाराचा आणि तिच्या तब्येतीवर परिणाम होईल याचा काही संबंध नाही. अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 27 जून रात्री 10.30 च्या सुमारास शेफाली जरीवालाच्या तब्येत बिघडली होती त्यामुळे तिला रात्री उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यता आले होते.

तर दुसरीकडे एका जुन्या मुलाखतीमध्ये शेफालीने स्वत:च खुलासा करत एक धक्कादायक खुलासा केला होता. शेफालीने एका मुलाखतीमध्ये सांगताना ती 15  वर्षापासून एका गंभीर आजाराने ग्रस्त होती असा खुलासा केला होता. ती 15 वर्षांची असताना तिला अपस्माराचा झटका आला होता. तिच्यावर अभ्यासाबाबत खूप दबाव होता. दबाव आणि तणावमुळे अपस्माराचा झटका येत होता असा खुलासा जून्या मुलाखतीमध्ये बोलताना तिने केला होता.

मराठीच्या संदर्भात होणाऱ्या मोर्चामध्ये पूर्ण ताकदीने सहभागी होणार; सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केली भूमिका

शालेय शिक्षणादरम्यान तिला वर्गात, स्टेजच्या मागे किंवा रस्त्यावर आणि इतर ठिकाणी झटके येत होते त्यामुळे आत्मविश्वास कमी होत होता त्यामुळे मी इंडस्ट्रीपासून दूर झाली होती असा खुसाला देखील तिने या मुलाखतीमध्ये केला होता. प्राथमिक माहितीनुसार, शेफाली जरीवालाच्या मृत्यचे कारण हृदयविकाराचा झटका आहे मात्र तिचा पोस्टमाॅर्टेम रिपोर्टे अद्याप आलेला नाही.

Exit mobile version