Download App

‘या’ कलाकाराला ओळखलं का? ‘शेहर लखोत’ सिनेमातून प्रेक्षकांचं करणार तुफान मनोरंजन

Priyanshu Painyuli Shehar Lakhot Movie: ‘चार्ली चोप्रा अँड द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅली’, ‘भावेश जोशी “मिर्झापूर,” आणि “अर्क” मधील त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जाणारे प्रियांशू पैन्युली (Priyanshu Painyuli ) त्याच्या नवीन वेब सिरीज “शेहर लाखोत” (Shehar Lakhot Movie) मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला असून अॅमेझॉन प्राइमवर (Amazon Prime) ही सीरिज आज (30 नोव्हेंबर) प्रदर्शित करण्यात येणार आहे.


देव तोमरच्या मुख्य भूमिकेत पाऊल टाकत पेन्युली (Priyanshu Painyuli ) आपल्या पात्राच्या भूतकाळातील गुंतागुंतींना चाहत्यांसमोर घेऊन येणार आहे. नवदीप सिंग दिग्दर्शित ही सिरीज प्रियांशू पैन्युलीच्या उल्लेखनीय अभिनयासाठी नक्कीच अनोखी ठरणार आहे. निओ-नॉयर शैलीमध्ये त्याचा परफॉर्मन्स बघण उत्सुकतेच ठरणार आहे.

चार्ली चोप्रा अँड द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅली” मधील उत्कृष्ट कामगिरीने वर्षाची सुरुवात करून पेन्युलीने ‘शेहर लखोत’ सोबत वर्षाची सुरुवात आणखीनच खास बनवलं आहे. प्रियांशू पैन्युलीचा अनोखा लूक आणि उत्कृष्ट कामगिरी यामधून अनुभवयाला मिळणार आहे. “यू-टर्न” सारख्या उल्लेखनीय प्रकल्पांनी त्याचे वैविध्यपूर्ण अनोखा अभिनय कौशल्य दाखवून दिले आहेत. “पिप्पा” आणि “चार्ली चोप्रा अँड द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅली” मधील अतिशय प्रभावी कामगिरीने ओटीटी स्पेस अगोदरच जिंकल्यानंतर प्रियांशू पैन्युली आता “शेहर लखोत” मध्ये चाहत्यांना प्रभावित करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Animal Advance Booking: रिलीज होण्याआधीच ‘ॲनिमल’ने जमवला एवढ्या कोटींचा गल्ला

तसेच नेटफ्लिक्स’वर गाजलेल्या ‘एक्स्ट्रॅक्शन’सिनेमातील क्राईम लॉर्ड ते अॅमेझॉन प्राईमवरील मिर्झापूरच्या दुसऱ्या भागातील रॉबिन… अभिनेता प्रियांशू पैन्युली याने अल्पावधीतच ओटीटी प्लॅटफॉर्मवर ओळख मिळवली आहे. ‘चलो, ये भी ठीक है’ हा डायलॉग रॉबिनच्या तोंडी प्रचंड गाजला होता. गर्लफ्रेण्ड वंदना जोशीसोबत तो नुकताच विवाहबंधनात अडकला आहे.

Tags

follow us