Shekhar Kapur : मनिराजं क्षेत्रातील प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर हे आता एका कारणामुळे जोरदार चर्चेत आला आहे. त्यांनी त्यांच्या आगामी मासूम २ या सिनेमासाठी चॅट जीपीटीची (Chat gpt) मदत घेतल्याचा आरोप लावण्यात आला होता. यावर आता त्यांनी भाष्य केले आहे. सिनेमा निर्माते शेखर कपूर यांनी गेल्या काही महिन्यापासून त्यांचा बहुचर्चित सिनेमा मासूमच्या सिक्वेलवर काम करत असल्याचे सांगितले जात आहे. कपूर यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर सिनेमातील काही प्रसंग प्रदर्शित केले आहे आणि त्यावर त्यांनी भाष्य केले आहे की, त्यांनी चॅट जीपीटीला मासूम २ साठी एक कथा लिहिण्यास सांगितले होते.
मिस्टर इंडिया, बॅंडिट क्वीन आणि एलिझाबेथ यांसारखे सिनेमा शेखर कपूर यांनी दिग्दर्शित केले आहेत. चॅट जीपीटीचा वापर केल्यावर, सिनेमा आणि त्याच्या विषयाबद्दल एआयच्या आकलनक्षमतेने ते आश्चर्यचकीत झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. एआय म्हणजेच (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) विषयी जोरदार चर्चा सुरु आहे आणि कसं ते सर्जनशील लेखन देखील चांगल्या प्रकारे करु शकणार, म्हणून मी ते वापरून बघायचं मी ठरवलं. मी चॅट जीपीटीला, माझा पुढचा सिनेमा, मासूम २ करीता एक कथा तयार करण्यासाठी सांगितले आहे.
सिनेमा त्याच्या विषयाबद्दल एआयच्या आकलनक्षमतेने मी आश्चर्यचकीत झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. एआयच्या कथेनुसार राहुल म्हणजेच जुगल हंसराज त्याच्या वडिलांनी त्याला का नकार दिले यावर ते नेहमी चिडून असायचा… परंतु नंतरच्या काळात तो एक मोठा होउन लग्न करतो…तसेच जोपर्यंत त्याला स्वतःची मुलं होत नाही, तोपर्यंत त्याला त्याच्या वडिलांवरील दबावाची जाणीव होत नसल्यचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. जेव्हा ते पहिल्यांदा एकमेकांना भेटतात तेंव्हा त्यांच्यावर असते… आणि शेवटी त्याच्या वडिलांना तो माफ केल्याचे बघायला मिळाले आहे.
नशीब माझी कथा एआयपेक्षा खूपच रंजक आहे .
तरीदेखील लक्षात ठेवा की चॅट जीपीटी व्हिडिओ बघत नाही. परंतु ३० सेकंदात मासूमबद्दल सांगितलेलं सर्व काही वाचलं जाणार आणि हातचालाखीने लहान राहुलसाठी एक विश्वासार्ह मोठा प्रसंग तयार केल्याचे सांगितले. तसेच तो ही ३० सेकंदात”, पुन्हा, आणि कृतज्ञतापूर्वक, एआय आमच्यापेक्षा उत्तम आणि जास्त प्रमाणात भावनिक कथा घेऊन आले नाही.. म्हणून मी अजूनही एआयपेक्षा उत्तम सर्जनशील आहे. असे कपूर यांनी यावेळी सांगितले आहे.
टायगर जिंदा है…’Tiger 3’चं पहिलं पोस्टर आऊट! भाईजान- कतरिनाच्या लूकने वेधलं लक्ष
लेखक हॉलिवूडमध्ये आंदोलनं का करत आहेत हे मला आजून देखील समजू शकले नाही. कारण एआय सिरिलयच्या भागांसाठी एक विश्वासार्ह कथा देण्यास सक्षम आहे! ओह! एआय माझ्या सर्जनशीलतेला समोरं जाण्याच्या अगोदर मी आणखी काही वेगळे सिनेमा वेगानं बनवू शकणार आहे, असेही कपूर यांनी आपल्या पोस्टमध्ये यावेळी सांगितले आहे.