Download App

Sherlyn Chopra : शर्लिन चोप्राला जीवे मारण्याची धमकी; अभिनेत्रीने आरोपीविरोधात दाखल केला गुन्हा

  • Written By: Last Updated:

Sherlyn Chopra : अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) सध्या जोरदार चर्चेत आहे. शर्लिनने एका फायनान्सर विरोधात मुंबईच्या जुहू पोलीस (Juhu Police Station Mumbai) ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण?

शर्लिन चोप्राने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, एका फायनान्सरने एका व्हिडीओच्या रेकॉर्डिंगकरिता शर्लिनला बोलवण्यात आले होते. यावेळी त्याने तिच्याबरोबर विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान शर्लिनने विरोध करायला सुरुवात केली. त्यावेळी तो तिला घाणेरड्या शिव्या देऊ लागला. तसेच त्याने तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली.


शर्लिन चोप्राच्या तक्रारीनुसार पोलिसांनी फायनान्सर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आयपीसी कलम 354,506,509 नुसार गुन्हा नोंद केला आहे. सध्या ते याप्रकरणाचा अधिक तपास घेत आहेत. फायनान्सरने एका व्हिडीओ रेकॉर्डिंगकरिता पैसे देण्याच्या बहाण्याने शर्लिनबरोबर जवळीकता साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने अभिनेत्रीला अश्लिल भाषेत शिवीगाळ देखील केली आहे.

Sanjay Dutt Injured : दुखापतीनंतर संजय दत्तच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची अपडेट समोर

शर्लिन चोप्रा कायम चर्चेत!

शर्लिन चोप्राने याआधी सिने-दिग्दर्शक साजिद खान (Sajid Khan) विरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल करण्यात आली होती. #MeToo या मोहिमेअंतर्गत अभिनेत्रीने लैंगिक छळाचा खुलासा केला होता. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी तिने बॉलिवूडची ड्रामाक्वीन राखी सावंत विरोधात देखील तक्रार केली होती.

Tags

follow us