Download App

Shilpa Shetty Look: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा लेहंग्यातील अनोखा अंदाज पाहिलात का?

Shilpa Shetty: जेव्हा सुंदर चेहऱ्यांबाबत मनात विचार येतो, तेव्हा आपसूकच आपल्या डोळ्यासमोर बॉलिवूडमधील (Bollywood) काही अभिनेत्रींचे चेहरे समोर येतात. (Shilpa Shetty Look) बॉलिवूडमधील या अभिनेत्रींनी आपले सौंदर्य आणि फॅशन स्टाइलबरोबरच (Fashion style) आपल्या अभिनयाने केवळ देशातीलच नव्हे तर विदेशातही आपला फॅन फॉलोइंग वाढवलेला आहे. (Social media) आज अशाच एका सुंदर मॉडेल, अभिनेत्री आणि बिझनेस वुमेन अभिनेत्री शिल्पा शेट्टीबाबत सांगणार आहोत.


तसेच शिल्पा शेट्टी कुंद्राने प्रख्यात डिझायनर अस्लम खान यांच्यासाठी फॅशन आणि ग्रेसच्या नेत्रदीपक प्रदर्शनात फॅशन शो केला आणि यात प्रेक्षकांची मन जिंकली. लग्नाची थीम असलेल्या वातावरणात सेट केलेला हा कार्यक्रम अस्लम खानच्या उत्कृष्ट निर्मितीसाठी एक परिपूर्ण कॅनव्हास होता आणि शिल्पा शेट्टी कुंद्रा ही लालित्येची प्रतीक आहे. शिल्पा शेट्टी कुंद्रा तिच्या फॅशनसाठी ओळखली जाते. तिच्या या खास लेहेग्याने सगळ्यांची मन तर जिंकून घेतली. तिने रॅम्पवर चालताना प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.

मागील अनेक वर्षांपासून ती एक फॅशन आयकॉन म्हणून उदयास आली आहे. जिच्याकडून प्रत्येक प्रसंगासाठी नव्या स्टाईलच्या अनेक प्रेरणा घेतल्या जाऊ शकतात. शिल्पाने तिच्या फिल्मी करिअरच्या पहिल्या इनिंगमध्ये अनेक अप्रतिम ट्रेंडच दिले नाहीत तर दुसऱ्या इनिंगमध्येही ती सतत अनेक ट्रेंड देत आली आहे. फ्यूजन साड्या, बेल्ट साड्या किंवा चमकदार-चकचकीत आउटफिट्स काहीही असो, शिल्पा शेट्टीच्या स्टाईलमध्ये खूप विविधता दिसत असते. फ्यूजन साड्यांव्यतिरिक्त फ्यूजन को-ऑर्डर सेट किंवा फ्यूजन लेहेंगा सेटही शिल्पाच्या वॉर्डरोबचा एक महत्त्वाचा भाग आहेत. शिल्पाचे हे लेहेंगा अनेक प्रसंगांसाठी बेस्ट आउटफिट्स प्रेरणा असू शकते.

टायगर जिंदा है…’Tiger 3’चं पहिलं पोस्टर आऊट! भाईजान- कतरिनाच्या लूकने वेधलं लक्ष

शिल्पा शेट्टीचे लग्न होण्याअगोदर अनेक अभिनेत्यांशी तिचे नाव जोडले गेले. यामध्ये सर्वात आधी खिलाडीचे नाव येते. दोघेही एका सिनेमात काम करत असताना जवळ आले होते. दोघांच्या नावाची त्यावेळी बॉलिवूडमध्ये मोठी चर्चा सुरु होती. त्यावेळी खिलाडीने लग्नासाठी शिल्पासमोर एक अट ठेवल्याचे बोलले जाते. लग्नानंतर शिल्पाने चित्रपटात काम करणे बंद केले पाहिजे, असे खिलाडीचे म्हणणे होते. परंतु, ही अट शिल्पाने मान्य केली नाही. नंतर दोघेही एकमेकांपासून दुरावले. खिलाडीने मग टि्वंकल खन्नाशी लग्न करु आपला संसार थाटला.

Tags

follow us