Download App

Shilpa Shetty च्या बहुप्रतिक्षित ‘सुखी’चा ट्रेलर ‘या’ दिवशी येणार

  • Written By: Last Updated:

Shilpa Shetty : शिल्पा शेट्टी कुंद्राच्या आगामी ‘सुखी’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यात आता या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होत असून शिल्पाचे चाहते यासाठी उत्सुक आहेत. शिल्पा तिच्या अष्टपैलुत्वासाठी आणि मनमोहक प्रतिभेसाठी ओळखली जाते. तिच्या ‘सुखी’ मधील अभिनयाने तिच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना पुन्हा एकदा मंत्रमुग्ध करण्यासाठी ती सज्ज झाली आहे. ट्रेलर रिलीजच्या बातमीने आता सगळ्यांना ट्रेलरची उत्सुकता लागली आहे.

Rohit Pawar : फडणवीस राजीनामा द्या! रोहित पवारांचा संताप

अभिनेत्री म्हणून शिल्पा शेट्टीचा अभिनय अफलातून आहे. तिच्या आगामी चित्रपट ‘सुखी’ साठी चाहत्यांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली असून 6 सप्टेंबरला ट्रेलर रिलीज होण्यासाठी सगळेच वाट बघत आहेत. चित्रपटाची कथा आणि पात्रांची झलक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चर्चा वाढवत आहे. चाहते तिच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘सुखी’ एक अत्यंत अपेक्षित सिनेमॅटिक अनुभव असणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अमित साध, चैतन्य चौधरी, किरण कुमार आणि कुशा कपिला यांसारख्या अफलातून प्रतिभावान कलाकारांचा समावेश आहे.

मोदी सरकारने ‘इंडिया’ला कामकाजातून वगळल्याचा आरोप: विरोधकांनी ‘भारत’ला दिला नवा लाँग फॉर्म

कसा आहे चित्रपट?
शिल्पाचा आगामी ‘सुखी’ हा चित्रपटामध्ये एका 38 वर्षीय पंजाबी गृहीणी सुखी म्हणजे कारला आणि तिच्या मैत्रिणींची कथा सांगणारा चित्रपट आहे. कारला आणि तिच्या मैत्रिणी 20 वर्षांनंतर शाळेच्या रियुनियनसाठी दिल्लीला जातात. त्यावेळी त्यांच्या भावविश्वातील गुढ गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे. त्यामुळे चाळीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या स्त्रीयांच्या आयुष्यातील उलथापालथी त्यात पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट 22 सप्टेंबरला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Tags

follow us