Shiv Thakare: शिव ठाकरेच्या घरी वर्दीतला गणपती बाप्पाचे दणक्यात आगमन

Shiv Thakare: सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची (Ganesh festival) लगबग पाहायला मिळत आहे. प्रत्येकाच्या घरोघरी गणरायाचं आगमन होत आहे. अनेक वेगवेगळ्या वेशातील सुंदर गणपतीच्या मूर्ती सध्या बाजार पेठेत बघायला मिळत आहे. ‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरेने (Shiv Thakare) देखील पोलिसांच्या (Police) गणवेशातील बाप्पाच्या मूर्तीचं दणक्यात आगमन केलं आहे.   View this post on Instagram   A post […]

Shiv Thakare

Shiv Thakare

Shiv Thakare: सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची (Ganesh festival) लगबग पाहायला मिळत आहे. प्रत्येकाच्या घरोघरी गणरायाचं आगमन होत आहे. अनेक वेगवेगळ्या वेशातील सुंदर गणपतीच्या मूर्ती सध्या बाजार पेठेत बघायला मिळत आहे. ‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरेने (Shiv Thakare) देखील पोलिसांच्या (Police) गणवेशातील बाप्पाच्या मूर्तीचं दणक्यात आगमन केलं आहे.


चौपाटीवर पोलिसांबरोबर सहभागी होत त्याने पोलिस बाप्पाचं स्वागत केल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहे. पोलिसांना त्याने दिलेलं हे ट्रिब्युट आहे. शिवचे पोलिस बाप्पाचे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. मराठी बिग बॉसचा विजेता आणि हिंदी बिग बॉसचा रनर अप ठरलेला सर्वांचा लाडका शिव ठाकरे त्याच्या साधेपणासाठी देखील ओळखला जातो. कधीही कोणता अॅटिट्यूड ना कुठला बडेजाव. शिव कायम सगळ्यांसोबत  हसतमुख असतो.

शिव ठाकरे कायम गरजूंची मदत करण्यासाठी तर तो नेहमी पुढाकार घेत असतो. काल मुंबईमध्ये पोलिस बाप्पाच्या मूर्तीचं अनावरण करण्यात आलं आहे. शिव आणि पोलिसांच्या हस्ते चौपाटीवर खाकी वेशातील गणरायाची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. पोलिसांच्या वेशातील बाप्पाच्या स्वागताला मोठी गर्दी देखील बघायला मिळाली. सर्वांनी जल्लोषामध्ये गणरायाला विराजमान केलं आहे.

Priya Bapat Birthday: रोमान्स अन् कॉमेडीचा तडका लावणारे मराठी ऑनस्क्रीन कपलबद्दल जाणून घ्या…

शिव ठाकरे नेहमी काहीतरी हटके करत असतो. त्याचा हा साधा स्वभाव चाहत्यांना कायम आवडतो. शिव सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. त्याची फॅन फॉलोइंग देखील एकदम हटके आहे. शिव लवकरच काही सिनेमांमध्ये देखील लवकरच बघायला मिळणार आहे. सध्या तो मराठी आणि हिंदी दोन्ही मनोरंजनसृष्टीत चांगलाच लोकप्रिय असल्याचे बघायला मिळत आहे.

Exit mobile version