मैडॉक फिल्म्स आणि कठपुतली क्रिएशन्स घेऊन आले ‘ईठा’चं पहिलं गाणं ‘जी जी रे जी’; श्रद्धा कपूरच्या लावणीच्या अदांनी जिंकली मनं!

Shraddha Kapoor Eetha Movie Song Ji Ji Re Ji; एपिक म्युझिकल ड्रामा ‘ईठा’मधील पहिलं गाणं ‘जी जी रे जी’ प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे.

Shraddha Kapoor Eetha Movie Song Ji Ji Re Ji

Shraddha Kapoor Eetha Movie Song Ji Ji Re Ji

Shraddha Kapoor Eetha Movie Song Ji Ji Re Ji: संगीताचा ठेका, लावणीचा जलवा आणि अदांचा भन्नाट तडका… मॅडॉक फिल्म्स आणि कठपुतली क्रिएशन्स यांनी त्यांच्या आगामी एपिक म्युझिकल ड्रामा ‘ईठा’मधील पहिलं गाणं ‘जी जी रे जी’ प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने आधीच इंटरनेटवर धुमाकूळ घातल्यानंतर आता या गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांना ‘ईठा’च्या रंगतदार दुनियेची पहिली संगीतमय झलक पाहायला मिळत आहे.

‘मातृभूमी’साठी कडाक्याच्या थंडीत बर्फाळ पाण्यात उतरला सलमान खान ; अपूर्व लाखियांचा मोठा खुलासा

या गाण्यात श्रद्धा कपूर ‘ईठा’च्या भूमिकेत दिसत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेती संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी या गाण्याला संगीतबद्ध करण्यापासून ते अरेंज, कंडक्ट आणि प्रोड्यूस करण्यापर्यंतची जबाबदारी सांभाळली आहे. अमिताभ भट्टाचार्य यांनी गाण्याचे बोल लिहिले असून श्रेया घोषालने आपल्या सुरेल आवाजाने त्यात रंग भरले आहेत. तर वैभवी मर्चंटच्या जबरदस्त कोरिओग्राफीवर श्रद्धा आपल्या नजाकतदार अदांनी, भन्नाट मूव्हमेंट्स आणि दमदार स्टेज प्रेझेन्सने अक्षरशः महफिल लुटताना दिसते. ‘जी जी रे जी’ हे केवळ एक गाणं नसून ताकद, जिद्द आणि एका कलाकाराच्या लिजेंड बनण्याच्या प्रवासाचा सुरेल उत्सव आहे.

‘ईठा’सारख्या चित्रपटासाठी संगीत हे केवळ कथेच्या पार्श्वभूमीवर वाजणारं माध्यम नाही, तर चित्रपटाच्या विश्वाचा अविभाज्य भाग आहे. एका दिग्गज कलाकाराच्या आयुष्यावर आधारित या कथेत संगीताच्या माध्यमातून ईठाचे भावविश्व, महत्त्वाकांक्षा, ओळख आणि तिचा संघर्ष प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. चित्रपटातील गाणी आणि संगीत प्रेक्षकांना थेट तिच्या जगात घेऊन जाण्यासोबतच कथेला आवश्यक असलेला भव्यपणा, लय आणि रंगमंचीय अनुभव देतात.

‘ईठा’साठी संगीत तयार करण्याच्या अनुभवाबद्दल अजय-अतुल सांगतात, “ईठासारख्या चित्रपटात संगीत केवळ बॅकग्राऊंडला वाजून चालणार नाही. ते व्यक्तिरेखेचा, तिच्या जगाचा आणि कथेतील भावनांचा एक भाग असणं गरजेचं होतं. प्रेक्षकांनी रंगमंचावर ईठाला जे पाहिलं, त्यापलीकडे तिच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. ती प्रचंड ताकद, नजाकत आणि जिद्द असलेली कलाकार होती. ‘जी जी रे जी’च्या माध्यमातून तिची ही ताकद प्रभावी, करिश्माई आणि सिनेमॅटिक पद्धतीने मांडण्याचा आमचा प्रयत्न होता, मात्र त्याचवेळी लावणीचा पारंपरिक बाजही जपायचा होता.

‘रामायण ची जगभर घोडदौड; ठरला सातवा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट

अमिताभ भट्टाचार्य हे अत्यंत प्रतिभावान आहेत. त्यांच्या दमदार शब्दांनी आमच्या संगीताला आणखी सुंदर बनवलं. त्यात श्रेयाने आपल्या आवाजातून गाण्याला जबरदस्त ऊर्जा आणि एक वेगळीच ओळख दिली. हे गाणं साकारण्यासाठी संपूर्ण टीमने मनापासून मेहनत घेतली आहे. श्रद्धाने प्रत्येक अदा अचूक जमवण्यासाठी जी मेहनत घेतली आहे, तिचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. हे गाणं तयार करताना आम्हाला जो उत्साह आणि आनंद मिळाला, तोच प्रेक्षकांनाही अनुभवायला मिळेल, अशी आशा आहे.”

नऊवारी साडी, पारंपरिक दागिने, घुंगरांचा नाद आणि रंगमंचावरची नाट्यमय ऊर्जा… गाण्यातील प्रत्येक गोष्ट ईठाच्या समृद्ध दुनियेचं दर्शन घडवते. मात्र या गाण्याचा खरा गाभा आहे एका स्त्रीची ताकद. गाण्याचे काव्यात्म शब्द ईठाला केवळ एक परफॉर्मर म्हणून नाही, तर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी, महत्त्वाकांक्षा आणि शांत ताकदीच्या जोरावर कायमची लक्षात राहणारी कलाकार म्हणून उभी करतात.

श्रद्धा कपूरसाठी ईठाच्या दुनियेत प्रवेश करणं हे आव्हानात्मक असलं, तरी तिने हा अनुभव मनापासून एन्जॉय केला. याबद्दल ती सांगते, “ईठाच्या भूमिकेत ‘जी जी रे जी’वर परफॉर्म करणं माझ्यासाठी खूपच रोमांचक अनुभव होता. लावणीमध्ये एक वेगळीच जादू आहे. तिची लय, हावभाव, ऊर्जा आणि प्रेक्षकांशी जोडून घेण्याची ताकद खरोखरच कमाल आहे. एका दिग्गज कलाकाराच्या अद्भुत विश्वात या गाण्याच्या माध्यमातून प्रवेश करताना मला जितका आनंद झाला, तितकीच मनात थोडी धाकधूकही होती. या गाण्यामागे एक खूप प्रभावी कथा आहे, कारण ते त्या महान कलाकाराच्या आयुष्यातील एका महत्त्वपूर्ण वळणाचं प्रतीक आहे. ही कथा गाण्यातून जिवंत करण्यासाठी आम्ही घेतलेली मेहनत प्रेक्षकांनाही जाणवेल, अशी आशा आहे.”

‘कोलंबस’ चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर लाँच! कोलंबस”च्या निमित्ताने अंकुर वाढवे ची अनोख्या इंडस्ट्रीमध्ये होणार एंट्री!

‘जी जी रे जी’च्या कोरिओग्राफीबद्दल वैभवी मर्चंट सांगतात, “एखादा कलाकार रंगमंचावर येण्याआधी आपल्या सोबत खूप काही घेऊन येतो. त्याचा संघर्ष, भावना आणि त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी केलेली मेहनत… पण एकदा का तो स्टेजवर पाऊल ठेवतो, की हे सगळं मागे सोडून तो थेट प्रेक्षकांशी एकरूप होतो. ‘जी जी रे जी’च्या कोरिओग्राफीमागे हीच भावना होती. श्रद्धाने या परफॉर्मन्ससाठी प्रचंड समर्पण आणि ऊर्जा दाखवली आहे. कोरिओग्राफीतील प्रत्येक बारकावा तिने खूप छान आत्मसात केला. अजय-अतुल यांच्या संगीतामुळे आम्हाला एक दमदार लय आणि ऊर्जा मिळाली, ज्यातून संगीत आणि नृत्याच्या माध्यमातून ईठाचं विश्व जिवंत करता आलं.

दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यासोबत काम करणं हा खूप आनंददायी अनुभव होता. ते एक उत्कृष्ट फिल्ममेकर असून त्यांच्याकडे अप्रतिम क्रिएटिव्ह व्हिजन आहे. पण त्याहीपेक्षा ते एक खूप सुंदर माणूस आहेत. त्यांची आपुलकी, कामाप्रती असलेली आवड आणि प्रत्येकाकडून सर्वोत्तम काम करून घेण्याची कला त्यांना एक खास व्यक्तिमत्त्व बनवते.”

श्रेया घोषाल सांगते, “काही गाणी अशी असतात जी तुम्ही फक्त गाता, तर काही गाणी अशी असतात जी तुम्ही काही मिनिटांसाठी जगता. ‘जी जी रे जी’ हे दुसऱ्या प्रकारातलं गाणं आहे. अजय-अतुल यांनी लावणीचा जोश, खट्याळपणा आणि नजाकत त्यांच्या संगीतामध्ये अप्रतिमपणे आणली आहे. हे सगळे रंग माझ्या आवाजातूनही प्रेक्षकांपर्यंत पोहोचावेत, अशी माझी इच्छा होती. ईठाच्या भूमिकेतील श्रद्धा कपूरसाठी गाणं गाणं हा माझ्यासाठी खूप आनंदाचा अनुभव होता. ती आपल्या व्यक्तिरेखेत इतका जीव ओतते की गाणं गाण्याचा आनंद आणखी वाढतो. ‘ईठा’ हा माझ्यासाठी खास चित्रपट आहे आणि त्याच्या संगीताचा भाग होणं ही खूप समाधान देणारी गोष्ट आहे. प्रत्येक सुरामागे असलेली मेहनत आणि आवड प्रेक्षकांनाही जाणवेल, अशी आशा आहे.”

श्रेया घोषालचा दमदार आवाज, अमिताभ भट्टाचार्य यांचे मनाला भिडणारे शब्द, अजय-अतुल यांचं ठेका धरायला लावणारं संगीत आणि वैभवी मर्चंटची भन्नाट कोरिओग्राफी… या सगळ्यांचा सुरेख मेळ साधत ‘जी जी रे जी’ने ‘ईठा’च्या कथेचा मूड सेट केला आहे. ही गोष्ट आहे अशा एका कलाकाराची, जिने रूढी-परंपरांना आव्हान दिलं, संकटांवर मात केली आणि आपल्या जिद्द व कलेच्या जोरावर स्वतःचं नाव इतिहासात अजरामर केलं.

IFFI 2026: इंडियन पॅनोरमात मराठी चित्रपटांचा ठसा! ‘आदी अनंत’, ‘बाप्या’, ‘देऊळ बंद 2’सह 6 चित्रपटांची निवड

‘जी जी रे जी’ हे गाणं आता प्रदर्शित झालं आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि दिनेश विजान, लक्ष्मण उतेकर व करिश्मा शर्मा निर्मित ‘ईठा’ हा चित्रपट ४ डिसेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

गाणं इथे पाहा:

Exit mobile version