Shreya Ghoshal to receive the 21st ‘Asha Bhosle Award: संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा 21 वा ‘आशा भोसले पुरस्कार 2026’ यंदा प्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांना जाहीर झाला आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा, पिंपरी-चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात येतो. शनिवारी (दि. 29 ऑगस्ट) सायंकाळी 5 वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
कंत्राटदार गजानन देवकतेंच्या आत्महत्येला आमदार, अधिकाऱ्यांची टक्केवारी जबाबदार?
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते श्रेया घोषाल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मान्यवरांची उपस्थिती
या पुरस्कार सोहळ्याला विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, आमदार अमित गोरखे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्यासह कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पुरस्काराचे स्वरूप
‘आशा भोसले पुरस्काराचे स्वरूप 1 लाख 11 हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे आहे. राष्ट्रीय स्तरावर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गायक आणि संगीतकारांचा या पुरस्काराद्वारे गौरव केला जातो.
सत्तेची, राजकारणाची आणि अस्तित्वाच्या संघर्षाची खडतर कहाणी; “ घामासान“ चा ट्रेलर केला प्रदर्शित !
‘आशा से श्रेया तक’ची सांगीतिक मैफल
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर मोरया थिएटर निर्मित ‘आशा से श्रेया तक’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम सादर केला जाणार आहे. यामध्ये गानसम्राज्ञी आशा भोसले आणि श्रेया घोषाल यांच्या लोकप्रिय आणि सदाबहार गीतांची मैफल रसिकांना अनुभवता येणार आहे.
हा संपूर्ण कार्यक्रम संगीतप्रेमी आणि नागरिकांसाठी विनामूल्य असणार आहे. कार्यक्रमाच्या नियोजित वेळेच्या किमान अर्धा तास आधी प्रेक्षकांनी आसनस्थ व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांगीतिक मेजवानीचा आनंद घ्यावा, असे आवाहन भाऊसाहेब भोईर यांनी केले.
पुरस्काराची गौरवशाली परंपरा
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे 2002 पासून हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान केला जात आहे. आतापर्यंत लता मंगेशकर, संगीतकार खय्याम, रवींद्र जैन, बप्पी लहरी, प्यारेलाल, आनंदजी, पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अनु मलिक, शंकर महादेवन, पं. शिवकुमार शर्मा, सुरेश वाडकर, हरिहरन, सोनू निगम, सुनिधी चौहान, पद्मभूषण उदित नारायण, रूपकुमार राठोड, अवधूत गुप्ते, डॉ. सलील कुलकर्णी आणि शान यांसारख्या दिग्गज कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
स्वतंत्र निवड समितीकडून निवड
‘आशा भोसले पुरस्कारासाठी स्वतंत्र निवड समिती कार्यरत आहे. या समितीत ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, डॉ. रवींद्र घांगुर्डे, वंदना घांगुर्डे, दिलीप काटकर, राजेशकुमार साकला आणि भाऊसाहेब भोईर यांचा समावेश आहे.
पुण्यात गणेशोत्सवात डीजेचा दणदणाट नको, शहराबाहेरुनच मिरवणूक काढा’; एका पुणेकराची मागणी
दरम्यान, बुधवारी चिंचवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेला नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष किरण येवलेकर, कोषाध्यक्ष राजेंद्र बंग, सहकार्य संतोष रासने, गौरी लोंढे, सहकोषाध्यक्ष संतोष शिंदे आणि सदस्य सुदाम परब आदी उपस्थित होते.
