Ek Daav Bhootacha Teaser Release : अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) आणि मकरंद अनासपुरे ( Makrand Anaspure) ही जोडी एका धमाकेदार सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आजवर मकरंद यांच्या सर्वच सिनेमानं प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरले, तर सिद्धार्थच्या सिनेमालाही प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शविली. आता ही जोडगोळी दमदार आणि उत्कंटावर्धक सिनेमातून लवकरच समोर येणार आहे. ‘एक डाव भुताचा’ (Ek Daav Bhootacha) असे सिनेमाचे नाव (Marathi Movie ) असून सिद्धार्थ जाधव आणि मकरंद अनासपुरे या सिनेमात प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
स्मशानात जन्म झाल्यामुळे सतत भूत दिसणाऱ्या तरुणाची धमाल गोष्ट “एक डाव भुताचा” या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 4 ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाविषयी उत्सुकता वाढवणारा टीजर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. रेवा इलेक्ट्रॉनिक्स या निर्मिती संस्थेने एक डाव भूताचा या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुती अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेंटने केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केलं आहे.
चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव यांच्यासोत नागेश भोसले, अक्षय कुलकर्णी, हर्षद नायबळ, मयूरी देशमुख, अश्विनी कुलकर्णी, नंदिनी वैद्य, वर्षा दांदळे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. डॉ. सुधीर निकम आणि संदीप मनोहर नवरे यांनी पटकथा लेखन, डॉ. सुधीर निकम यांनी संवाद लेखन, गौरव पोंक्षे यांनी छायांकन, विक्रांत हिरनाईक यांनी गीतलेखन, गौरव चाटी यांनी संगीत दिग्दर्शन, प्रणव पटेल, मनु असाटी यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम, अवधूत गुप्ते, रोहित राऊत आणि गायिका आनंदी जोशी यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत.
Panchak Marathi Movie: बॉलिवूडलाही पडली ‘पंचक’ची भुरळ
स्मशानात जन्म झाल्यानं सतत भूत दिसणाऱ्या तरुणाची भूमिका अभिनेता सिद्धार्थ जाधवनं निभावली आहे, तर मकरंद अनासपूरे भूताच्या भूमिकेत आहेत. माणूस आणि भुताच्या नात्याची रंगतदार गोष्टीला प्रेमकहाणीचा तडकाही आहे. त्यामुळे मनोरंजक कथानक, सकस अभिनय असलेला हा चित्रपट आता मोठ्या पडद्यावर येण्याची प्रतीक्षा आहे. त्यासाठी 4 ऑक्टोबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे.