Download App

Lagnna kallol: आदर्श शिंदेच्या आवाजातील प्रेमातील दुःख व्यक्त करणार “घाव लागला” गाणं प्रदर्शित

Lagna kallol Ghaav Laagla Song Release: सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) आणि मयुरी देशमुखच्या (Mayuri Deshmukh) “लग्नाचा कल्लोळ” (lagnna kallol Movie) चित्रपटातील तिसरे गाणं प्रदर्शित झालं आहे. या चित्रपटातील “घाव लागला” हे गाणं नूकतचं प्रदर्शित झालं आहे. (Social media) या चित्रटातील गाण्याला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. गाण्यामध्ये मयुरी देशमुख, सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधान दिसत आहेत. चित्रपटातलं हे धमाकेदार गाणं प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे (Adarsh Shinde) यांनी आपल्या मधुर आवाजातून गायलं आहे.

“घाव लागला” या गाण्याला जय अत्रे यांचे जबरदस्त बोल आणि प्रफुल्ल कार्लेकर आणि स्वप्नील गोडबोले यांचे उत्स्फूर्त संगीत लाभले आहे. प्रत्येकाच्या काळजावर घाव घालणाऱ्या या गाण्याचे दिग्दर्शन प्रिन्स याने केले आहे. यामध्ये मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवचा एक अनोखा लूक या सिनेमात पाहायला मिळत आहे. या गाण्यातून त्याच्या काळजातील मयुरीबद्दलची भावना, प्रेम तो व्यक्त करत असल्याचे दिसत आहे. हे जबरदस्त गीत ऐकायला जितके मस्त वाटते तितकेच पाहायला देखील उत्तम आहे.

मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर ‘लग्नकल्लोळ’चे दिग्दर्शन मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॅा. मयुर आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे यांनी केले आहे. जितेंद्रकुमार परमार लिखित हा मराठी सिनेमा येत्या 1 मार्च रोजी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Neha Pendse: टेलिव्हिजन गाजवलं; आता अभिनेत्री लवकरच ओटीटी मध्ये पदार्पण करणार?

अतिशय एनर्जेटिक असे हे गाणे असून सिद्धार्थ जाधव, आदर्श शिंदे ही जोडी एकत्र आल्याने या गाण्यातील उत्साह द्विगुणित झाला आहे. या गाण्याच्या शब्दांनी आणि संगीताने खूपच भर टाकली आहे. तसेच सिद्धार्थ आणि मयुरीची अफलातून केमिस्ट्री या गाण्यातून दिसत आहे. मला आशा आहे, पहिल्या गाण्याप्रमाणेच हे गाणेही चाहत्यांच्या पसंतीस उतरणार असल्याचा विश्वास डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे यांनी व्यक्त केला आहे.

follow us

वेब स्टोरीज