Download App

Lagna Kallol: मयुरी नक्की कोणासोबत संसार थाटणार, ‘लग्न कल्लोळ’चा धमाकेदार टिझर रिलीज!

Lagna Kallol Movie Teaser Release: मयुरी देशमुख, सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) आणि भूषण प्रधान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘लग्नकल्लोळ’ (Lagna Kallol Movie ) या चित्रपटाचा जबरदस्त टिझर (Lagna Kallol Teaser) नुकताच प्रदर्शित झाला आहे. (Marathi Movie) टिझर पाहून प्रेक्षक या धमाकेदार चित्रपटाची आतुरतेने वाट पाहाणार, हे नक्की! टिझरमध्ये सिद्धार्थ सोबत मयुरी लग्नमंडपात दिसत आहे तर दुसऱ्या क्षणी भूषण मयुरीला लग्नाची मागणी घालताना दिसत आहे. यावरून मयुरी नक्की कोणासोबत लग्न करणार आणि हा काय ‘लग्नकल्लोळ’ सुरू आहे, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहे.


चित्रपटात या प्रमुख कलाकारांसोबत अनेक दमदार कलाकार आहेत. हा लग्नाचा धमाका 1 मार्चला उडणार आहे. मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे, आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शित ‘लग्न कल्लोळ’ या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक, मोहम्मद बर्मावाला म्हणतात, ” चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. लग्न म्हटले की घरात कल्लोळ हा आलाच. परंतु हा कल्लोळ जरा वेगळा आहे. यात ट्विस्ट आहे. हा कौटुंबिक चित्रपट असून प्रेक्षकांसाठी निखळ मनोरंजनाचा खजिना आहे.’’

Shri Shivaji Temple: ‘मित्राची गोष्ट’ अन् ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ या नाटकांचे प्रयोग रंगणार

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक, निर्माते डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे म्हणतात की, ” लग्न… हा विषय तसा म्हटला तर अतिशय जिव्हाळयाचा. हा विषय घेऊन अतिशय सुंदररित्या या चित्रपटाचे लेखन करण्यात आले आहे. टिझरवरून प्रेक्षकांना हा अंदाज आला असेलच की, हा चित्रपट प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणार आहे. यात हसू आहे, आसूही आहेत. त्यामुळे आता या ‘लग्न कल्लोळा’त सहभागी होण्यासाठी सगळ्यांनी सज्ज राहा.”

follow us

वेब स्टोरीज