Sidharth and Kiara : सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाह संपन्न, दिल्लीत ग्रॅंन्ड रिसेप्शनची तयारी सुरू

जैसलमेर : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी 7 फेब्रुवारीला विवाह बंधनात अडकले. दोघांचे परिवार, नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये हे दोघे विवाह बंधनात अडकले. हे कपल 5 फेब्रुवारीला जैसलमेरला पोहचले होते. तेव्हापासूनच त्यांचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन सुरू झाले होते. View this post on Instagram A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) […]

Untitled Design 2023 02 08T110225.397

Untitled Design 2023 02 08T110225.397

जैसलमेर : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी 7 फेब्रुवारीला विवाह बंधनात अडकले. दोघांचे परिवार, नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये हे दोघे विवाह बंधनात अडकले. हे कपल 5 फेब्रुवारीला जैसलमेरला पोहचले होते. तेव्हापासूनच त्यांचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन सुरू झाले होते.

आता त्यांचा शाही विवाह सोहळा पार पडल्यानंतर आता या कपलच्या रिसेप्शनची सयारी त्यांच्या सुरू झाली आहे. या रिसेप्शनचे काही अपडेट्स समोर आले आहेत. जैसलमेरमध्ये शाही विवाह सोहळा पार पडल्यानंतर, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीच्या विवाह संपन्न झाला. आता दिल्लीमध्ये या विवाह सोहळ्याचं रिसेप्शन पार पाडणार आहे.

यामध्ये एक रिसेप्शन दिल्लीमध्ये पार पाडणार आहे. तर दुसरं रिसेप्शन मुंबईमध्ये पार पाडणार आहे. एका खासगी हेलिकॉप्टरने हे कपल जैसलमेरहून दिल्लीला रवाना होणार आहे. 9 फेब्रुवारीला दिल्लीमध्ये रिसेप्शन होमार आहे. तर 10 फेब्रुवारीला सिड-कियारा मुंबईला पोहचणार आहेत. मुंबईतील रिसेप्शन 12 फेब्रुवारीला पार पाडणार आहे.

कियारा आडवाणीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या शाही विवाह सोहळ्याचे फोटो शेअर केले. वधूवराच्या या लूकमध्ये सिद्धार्थ-कियारा एखाद्या महाराणी आणि राजा प्रमाणे शाही दिसत होते. त्यांचे हे फोटो मंत्रमुग्ध करणारे होते. हे फोटो शेअर करताना कियाराने कॅप्शन दिले आहे की, ‘अब हमारी परमानेंट बुकिंग हो गई है.’

Exit mobile version