Download App

Sidhu Moose Wala : सिद्धू मूसेवालांचे ‘मेरा ना’ गाणं चाहत्यांच्या भेटीला; अल्पावधीतच मिळाले मिलिअन व्ह्यूज!

  • Written By: Last Updated:

Sidhu Moose Wala New Song : दिवंगत गायक आणि रॅपर सिद्दधू मूसेवाला (Sidhu Moose Wala) यांचे ‘मेरा ना’ (Mera Na) हे नवं गाणं आता चाहत्यांच्या भेटीला आलं आहे. कमी वेळातच हे गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. निधनानंतर रिलीज होणारे सिद्धू मूसवाला यांचं हे तिसरं गाणं आहे. याअगोदर त्यांची ‘वॉर’ आणि ‘SYL’ ही गाणी चाहत्यांच्या भेटीला आली होती. सिद्धू मूसेवालाचा यांचा तरुणवर्ग हा मोठा चाहतावर्ग आहे.

निधनानंतर त्याच्या गाण्याची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ असलयाचे दिसून आले आहे. त्याचं ‘मेरा ना’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे कमी काळामध्येच या गाण्याला मिलिअन व्ह्यूज मिळाले आहेत. तर रिलीजच्या १० मिनिटांत या गाण्याला १ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

सिद्धू मूसेवाला यांचं ‘मेरा ना’ हे गाणं ग्रॅमी पुरस्कार विजेते नाइजीरियन रॅपरने गायलं आहे. ‘मेरा ना’ या गाण्याला रेकॉर्डब्रेक व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यावर चाहत्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. लेजेंड्स कायम जिवंत राहतात, भावा तुझी खूप आठवण येत आहेत, अशा कमेंट्स चाहते करत आहेत. आता सिद्धू मूसेवाला याच नवीन कोणते गाणे रिलीज होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागलेली आहे.

Salman Khan : ‘जिवे मारण्याच्या धमकीनंतर’ भाईजानने उचलले मोठे पाऊल; थेट विदेशातून मागवली…

5 ते 6 महिन्यांनी सिद्धू मूसेवालाचा आणखी एक गाणं रिलीज होणार!

सिद्धू मुसेवाला यांच्या अरदासच्या वेळी त्यांच्या वडिलांनी सिद्धूला गाण्यांच्या माध्यमातून कायम जिवंत ठेवणार असल्याचे सांगितले होते. सिद्धूचे वडील बलकौर सिंह म्हणाले होते की, दर ५-६ महिन्यांनी सिद्धूचे एक गाणं रिलीज करणार आहेत, जेणेकरून सिद्धूची सगळी गाणी पुढील ५-७ वर्षे रिलीज होणार आहेत, आणि ते लोकांच्या हृदयामध्ये कायम जिवंत राहणार आहे.

२९ मे २०२२ जी संध्याकाळी पंजाबच्या मानसा जिल्ह्यात सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर तब्बल २६ दिवसांनी त्यांचे ‘SYL’ हे नवीन गाणं चाहत्यांच्या भेटीला आलं होतं. सिद्धू मूसेवालाच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर हे गाणं रिलीज करण्यात आलं होतं. २ दिवसांतच या गाण्याला २७ मिलियन व्ह्यूज मिळाले होते. तर ३३ लाख लोकांनी सिद्धूच्या या गाण्याला आपली पसंती दर्शवली होती. सिद्धू मूसेवाला यांचे SYL हे गाणं यूट्यूबवर जोरदार ट्रेंड करत होतं.

Tags

follow us