Sikandar Collection : बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता सलमान खान (Salman Khan) बॉक्सऑफिस धमाका करण्यासाठी तयार आहे. 30 मार्च रोजी त्याचा नवीन चित्रपट ‘सिकंदर’ रिलीज होणार आहे. नुकतंच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्याला सोशल मीडियावर जबरदस्त रिस्पॉन्स देखील मिळत आहे. त्यामुळे सिकंदर (Sikandar) बॉक्सऑफिसवर मोठी कमाई करणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुढील काही दिवसात भारतात या चित्रपटासाठी ॲडव्हान्स बुकिंग सुरु होणार आहे. तर दुसरीकडे सिकंदरचे परदेशात ॲडव्हान्स बुकिंग सुरु करण्यात आले आहे. या चित्रपटाची परदेशात ॲडव्हान्स बुकिंग पाहता चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच परदेशात प्रचंड कमाई करताना दिसत आहे.
या देशात सिकंदरवर पैशांचा पाऊस
भारतात सिंकदरसाठी ॲडव्हान्स बुकिंग सुरु होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक आहे मात्र त्यापूर्वी या चित्रपटासाठी अमेरिका (USA) आणि युएईमध्ये (UAE) ॲडव्हान्स बुकिंग सुरु झाली आहे. अमेरिका आणि युएईमध्ये या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच बंपर कमाई केली आहे. लिमिटेड मल्टिप्लेक्स चेन असलेल्या कोई-मोईच्या मते, युएईमध्ये या चित्रपटाच्या 253 शोसाठी 799 तिकिटे विकली गेली आहे. त्यामुळे सिंकदरने प्रदर्शित होण्यापुर्वीच संयुक्त अरब अमिराती दिरहम 45.76 हजार रुपयांची कमाई केली आहे. भारतीय रुपयात अंदाजे 10.71 लाख रुपयांची कमाई केली आहे.
माहितीनुसार,हा आकडा आणखी वाढणार आहे. याचा कारण म्हणजे ‘सिकंदर’चा ट्रेलरला सोशल मीडियावर रिस्पॉन्स चांगला मिळताना दिसत आहे. त्यामुळे भारतासह परदेशात देखील सिकंदर बंपर कमाई करू शकतो. गेल्या काही दिवसांपासून सलमान खानचा ‘सिकंदर’ हा चित्रपट बहुचर्चित चित्रपट म्हणून खूप चर्चेत आहे.
कोण गद्दार हे सिद्ध झालंय, कुणाल कामरा प्रकरणात CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिग्दर्शक एआर मुरुगदास यांच्या या अॅक्शन थ्रिलर चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ओपनिंग मिळवू शकतो आणि हा चित्रपट सलमानच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट देखील बनू शकतो.