ट्रेंड सेटर गायक अभिजीत सावंतच्या नव्या लूक सोबतीने नव्या प्रोजेक्टची चर्चा …..

आताच्या तरुणाईला सुमधुर आवाजाने भुरळ घालणारा अभिजीत कायम त्याचा नवनवीन आणि वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्समुळे चर्चेत असतो.

Untitled Design 20 1

Untitled Design 20 1

Singer Abhijeet Sawant’s new look : काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया वर अभिजीत सावंतने त्याचा नव्या लूकचा एक खास व्हिडिओ शेयर केला आणि त्याचे नवे लूक्स सोशल मीडिया वर व्हायरल होऊन चर्चांना उधाण आलं. अभिजीतने नव्या प्रोजेक्ट साठी हा नवा लूक केला का ? तो नवा चित्रपट किंवा गाणं करणार का ? असे असंख्य प्रश्न निर्माण होऊन शेवटी आता या प्रश्नांना पूर्णविराम मिळाला आहे.

इंडियन आयडॉल पासून जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा गायक ते अगदी आताच्या तरुणाईला सुमधुर आवाजाने भुरळ घालणारा अभिजीत कायम त्याचा नवनवीन आणि वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्समुळे चर्चेत असतो आता लवकरच तो अजून दोन नव्या प्रोजेक्ट्सचा भाग होणार असल्याचं कळतंय.

विदेशी गुंतवणूकदारांना सरकारी बाँडवरील व्याज आणि नफ्यावर करमाफी, रुपयाच्या घसरणीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नुकतंच अभिजीतने कोकणात जाऊन तिथल्या समृद्ध संपन्न वातावरणात एक सुंदर गाणं शूट केलं आहे पण हे गाणं नेमकं काय हे अद्याप गुलदस्त्यात आहे. कोकणच्या सौंदर्याची खास झलक देत त्याने नवा व्हिडिओ देखील सोशल मीडिया वर शेयर केला आहे आणि आता चाहत्यांना त्यांचा नव्या गाण्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

तर एकीकडे आगामी ” स्वप्नसुंदरी” या चित्रपटात देखील अभिजीत एक नवीन गाणं करणार असल्याचं कळतंय. भूषण प्रधान आणि सायली पाटील यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला आता अभिजीतच्या गाण्याची सुंदर साथ लाभली आहे. 24 जुलैला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात अभिजीत सावंतच्या गाण्याची मेजवानी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

आगामी काळात देखील अभिजीत अजून उत्कंठावर्धक प्रोजेक्ट्सचा भाग होणार असून तो त्यांचा चाहत्यांना म्यूजिकल ट्रीट देणार यात शंका नाही !

Exit mobile version