कैलाश खैर बॉलिवूड इंडस्ट्रीतील जबरदस्त सिंगरआहे. (Song) त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक गाणी गायली. कैलाश खैर सध्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत. या व्हिडीओत कैलाश खैर यांना 2 ओळी गाण्यासाठी कार्यक्रमातील अँकर आग्रह करतो. जेणेकरुन प्रेक्षकांचं मनोरंजन होईल. मात्र, कैलाश खैर यांना त्यांच्याकडे केलेली विनंती आवडलेली नाही.
कैलाश खैर यांचं असं म्हणणं आहे की, यामुळे कलाकाराचा सन्मान कमी होतो. नुकतेच एका अवॉर्ड शोमध्ये त्यांच्याकडे अशीच गाण्याची रिक्वेस्ट करण्यात आली होती. मात्र, त्यांनी विनंती नाकारली. तसेच कलाकारांच्या सन्मानाबद्दल आपले मत व्यक्त केलं.
रिहा चक्रवर्ती सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मोठा दिलासा; कोर्टाने दिले हे आदेश
कैलाश खैर यांनी 25 एप्रिल रोजी दिल्लीतील ताज पॅलेस येथे आयोजित ‘सिक्स सिग्ना लीडरशिप समिट इन हेल्थकेअर’ या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. अवॉर्ड शो दरम्यान, होस्टने त्यांच्यासमोर एक विनंती केली. होस्टने त्यांना काही ओळी गाण्यास सांगितले . होस्टची विनंती ऐकताच कैलाश खैर नाराज झाले.
कैलाश खैर म्हणतात, ‘मला हेच बदलायचे आहे. गायक आणि म्यूझिककडे केवळ काही ओळी गाऊन दाखवा आणि वातावरण निर्मिती करण्याच्या दृष्टीने पाहू नका. हे मला खूप चुकीचे वाटते. अशा प्रकारच्या विनंती करु नका’, असं कैलाश खैर म्हणाले. यावेळी उदाहरण देत कैलाश खैर म्हणाले, ‘तुम्ही सचिन तेंडुलकरला सारखं षटकार मारायला सांगाल का? किंवा एखाद्या सैनिकाला सांगाल का की, आपली पोजिशन घेऊन फायर करा? असं कुणीही करत नाही.
कलाकाराला विदुषक बनवू नका. कलाकार एक साधक असतो, त्याला मनोरंजनाचा साधन समजू नका’. असंही कैलाश खैर म्हणाले. सोशल मीडियावर सध्या कैलाश खैर यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहे. काहींनी त्यांच्याशी सहमती दर्शवली. तर, काहींनी त्यांच्यावर टीका केली. एका युजरने म्हटलं की, ‘जर 2 ओळी गाणं गायल्याने कुणाच्या चेहऱ्यावर आनंद येत असेल तर, यात काय वाईट आहे?’ असा सवाल उपस्थित केला.
