Singer Shaan: भारतात सर्वत्र ईदचा सण (EID Mubarak) मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. ईदनिमित्त मुस्लिम बांधवात आनंदमय वातावरण असल्याचे दिसून येत आहे. बॉलीवूडच्या (Bollywood) अनेक कलाकरांनी सध्या सोशल मीडियावर (Social media) चाहत्यांना ‘ईद मुबारक’ म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. प्रसिद्ध गायक शानने (Singer Shaan) देखील आपल्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मात्र, शानच्या या शुभेच्छा चाहत्यांना काय आवडले असलयाचे दिसत नाही. चाहत्यांनी शानच्या त्या पोस्टवर जोरदार टीका करायला सुरवात केली आहे. शाननं शेअर केलेल्या फोटोमध्ये तो डोक्यावर टोपी घालून नमाज पढत असलयाचे दिसून येत आहे. शानचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्येनं हा फोटो शेअर करत कॅप्शन दिले आहे की तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला ईद मुबारक..”
मात्र, या फोटोवरुन चाहत्यांनी त्याला चांगलच ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका यूजरने कमेंट करत लिहिले आहे की, हा मुसलमान कधीपासून झाला..’, मला वाटलं की हा बंगाली आहे. तर दुसऱ्याने लिहिले की,’शुभेच्छा द्यायच्या फक्त.. हे करायची गरज काय होती. कोणत्या मुसलमानाने कधी डोक्यावर टिळा लावून शुभेच्छा दिले आहेत का कधी?उलट असं करून तू चुकीचा ठरला.
काही लोकांनी तर मुद्दाम शानला जय परशुराम आणि अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच शानने त्या फोटोविषयी स्पष्टीकरण देताना लिहिले आहे की, आज ईद आहे. मी ३ वर्षाअगोदर एक व्हिडीओ केला होता. पलाश मुच्छलसाठी मी तो व्हिडीओ केला होता. करम कर दे.. असं त्या व्हिडिओचे नाव होते. त्यामध्ये असा लूक होता. मी विचार केला की ईद या सणादिवशी पोस्ट करण्यासाठी हा फोटो एकदम योग्य होता…बस एवढासा विषय होता.
तसेच शानने या प्रकरणावर स्पष्टीकरण देणार एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रत्येक धर्माचा सम्मान करायला मला शिकवले आहे. हीच माझी विचारसरणी आहे आणि ही प्रत्येक हिंदुस्थानी माणसाची विचारसरणी असायला हवी. बाकी तुमचे विचार करण्याची पद्धत तुमच्याकडे राहू दे. त्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये शानने ‘जय परशुराम’ देखील असे लिहिले आहे. या प्रकरणावरून चाहत्यांनी त्याला चांगलच ट्रोल केलं आहे.