Tina Turner Passed Away: दिग्गज संगीतकार टीना टर्नर यांचे निधन…

Tina Turner Passed Away: दिग्गज संगीतकार टीना टर्नर यांचे निधन झाले आहे. त्या ८३ वर्षाच्या होत्या. क्वीन ऑफ रॉक ‘एन’ रोल म्हणून ओळखल्या जाणार्‍या टीना टर्नर (Tina Turner) यांनी त्यांच्या गाण्याने देशभरातील लोकांना प्रभावित केले होते. गायक, गीतकार, नृत्यांगना, अभिनेत्री आणि लेखिका अशा विविधांगी क्षेत्रात त्यांनी नाव कमावले आहे. टीना यांचे २४ मे रोजी दीर्घ […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 25T105324.622

Tina Turner Passed Away

Tina Turner Passed Away: दिग्गज संगीतकार टीना टर्नर यांचे निधन झाले आहे. त्या ८३ वर्षाच्या होत्या. क्वीन ऑफ रॉक ‘एन’ रोल म्हणून ओळखल्या जाणार्‍या टीना टर्नर (Tina Turner) यांनी त्यांच्या गाण्याने देशभरातील लोकांना प्रभावित केले होते. गायक, गीतकार, नृत्यांगना, अभिनेत्री आणि लेखिका अशा विविधांगी क्षेत्रात त्यांनी नाव कमावले आहे. टीना यांचे २४ मे रोजी दीर्घ आजाराने निधन झाले आहे.


स्वित्झर्लंडमधील झुरिचजवळील कुसनाच्त येथील घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. “क्वीन ऑफ रॉक ‘एन’ रोल टीना टर्नर यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी स्वित्झर्लंडमधील झुरिचजवळील कुसनाच्त येथील त्यांच्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण संगीत क्षेत्रातील एक दिग्गज आणि आदर्श गमावला आहे,” असे निवेदनात सांगण्यात आले आहे.“त्यांच्या अंत्यसंस्काराला जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित असणार आहेत.

कृपया या दुःखाच्या क्षणी त्यांच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करा,” असे पुढे निवेदन नमूद केले आहे. अमेरिकन गायिका असलेल्या टीना ह्या १९९४ पासून त्यांचा पती, जर्मन अभिनेते आणि संगीत निर्माते एरविन बाख यांच्याबरोबर स्वित्झर्लंडमध्ये राहात होत्या. त्यांना २०१३ मध्ये स्विस नागरिकत्व मिळाले होते. अलिकडील काही वर्षांत त्या स्ट्रोक, आतड्यांसंबंधी कर्करोग आणि अनेक गंभीर आरोग्य समस्यांनी त्रस्त होत्या.

‘The Kerala Story’ वरून सुरू असलेल्या वादावर कंगना रनौत पुन्हा उचकली; म्हणाली, “असे चित्रपट…”

तसेच त्यांची किडनी निकामी झाली होती. टर्नर यांनी १९५७ मध्ये आयके टर्नरच्या किंग्स ऑफ रिदममधून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. रॉक संगीत क्षेत्रात त्यांची कारकीर्द प्रदीर्घ राहिली. टर्नर यांनी ४ दशकांत बिलबोर्ड टॉपमध्ये ४० हिट्स मिळवले आहेत. जगभरात १० कोटीपेक्षा जास्त त्यांचे रेकॉर्ड विकले गेले आहेत.

Exit mobile version