Download App

Singer Usha Uthup यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, पती जानी चाको उथुप यांचं निधन

Usha Uthup त्यांचे पती जानी चाको उथुप यांचं कोलकाता येथे निधन झालं. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झाल्याचं सांगितलं जात आहे.

Singer Usha Uthup Husband Jani Chacko Uthup Dead : भारतीय पॉप गायिका उषा उथुप यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे पती जानी चाको उथुप यांचं सोमवारी (8 जुलै) कोलकाता येथे निधन झालं. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झाल्याचं सांगितलं जात आहे. आज (9 जुलै) त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडतील. अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली.

Video: धक्कादायक घटना! हात अन् पाय पकडून महिलेला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

उथुप त्यांचे पती जानी हे घरामध्ये टीव्ही बघत होते. त्यावेळेसच त्यांना अचानक अस्वस्थता जाणवली. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं. जानी चाको हे चहाच्या मळ्याच्या व्यवसायामध्ये होते. उषा आणि जानी यांचे पहिली भेट सत्तरच्या दशकात आयकॉनिक ट्रिनकासमध्ये झाली होती. या दोघांना एक मुलगी आहे. तर एक मुलगा आहे ज्याचं नाव सनी आहे.

Video: प्रिय मित्र, वेलकम; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडून दिलखूलास स्वागत

त्यांची मुलगी अंजली हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत आपल्या वडिलांच्या निधनाची बातमी दिली. त्यामध्ये ती म्हणाली की, अप्पा, तुम्ही खूप लवकर निघून गेले. पण तुम्ही जितके स्टायलिश जगलात. त्यावरून तुम्ही जगातील सर्वात देखणा माणूस होते. आम्ही तुमच्यावर प्रेम करतो. एक खरा गृहस्थ आणि लॉरेन्सियन आणि उत्तम चहाचा स्वाद घेणारा. असं म्हणत तिने ही पोस्ट केली आहे.

वरळी हिट अँड रन प्रकरणात धक्कादायक माहिती उघड; मिहीर शहानं सीट बदलली अन् BMW….

जानी चाको उथुप यांच्यासोबत उषा यांचा हा दुसरा विवाह होता. उषा यांचे पहिले पती दिवंगत रामू हे होते. उषा यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गायले आहेत. यामध्ये अनेक प्रसिद्ध अशा बॉलीवूड गीतांचा समावेश आहे. 1969 मध्ये चेन्नईतील एका छोट्या नाईट क्लबमध्ये परफॉर्म करून त्यांनी आपल्या संगीत क्षेत्रातील कार्य केला सुरुवात केली होती. नुकतच उषा उथुप यांना पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पुरस्काराने सन्मानित केले.

follow us