Download App

Sonam Kapoor: ‘कॅमेऱ्यासमोर परत येण्यासाठी खूप उत्साहित’, अभिनेत्रीने स्पष्टच सांगितले

Sonam Kapoor: बॉलिवूडची (Bollywood) फॅशनिस्टा म्हणून नावलौकिक मिळवणारी अभिनेत्री म्हणजे सोनम कपूर (Sonam Kapoor).

Sonam Kapoor: बॉलिवूडची (Bollywood) फॅशनिस्टा म्हणून नावलौकिक मिळवणारी अभिनेत्री म्हणजे सोनम कपूर (Sonam Kapoor) . कोणतीही फॅशन सोनम बिनधास्तपणे कॅरी करते त्यामुळे तिची नेटकऱ्यांमध्ये कायम चर्चा असते. (Sonam Kapoor Is Excited) गेल्या काही काळापासून सोनम इंडस्ट्रीपासून दूर आहे. मात्र, तिच्याविषयीचे किस्से कायम चाहत्यांमध्ये रंगतात. (Pregnancy) आजवर सोनमने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. मात्र, तिला म्हणावं तसं यश मिळालं नाही. आता अभिनेत्री कॅमेऱ्यासमोर परत येण्यासाठी खूप उत्साहित झाल्याचे पाहायला मिळत आहे.


बॉलिवूड स्टार सोनम कपूर पुढील वर्षाच्या सुरुवातीला आपल्या प्रेग्नंसी नंतरच्या पहिल्या प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी सज्ज आहे. हा प्रोजेक्ट एका ग्लोबल प्लॅटफॉर्मवर स्ट्रीमिंग होणार आहे. या प्रोजेक्टची अधिक माहिती लवकरच जाहीर केली जाईल. सोनमने पुष्टी केली, “प्रेग्नंसीनंतर पुन्हा कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी मी खूपच उत्साहित आहे. मला अभिनेत्री असणे खूप आवडते आणि माझ्या प्रोफेशनमुळे अनेक रोचक पात्रांना जगणे आवडते. माणसं मला नेहमीच आकर्षित करतात आणि विविध भूमिका साकारायला मला आवडतं. मी माझ्या पुढच्या प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहे.

ती पुढे म्हणाली की, “मी पुढील वर्षाच्या सुरुवातीला सेटवर परतणार आहे. या प्रोजेक्टचे तपशील सध्या ठरवले जात आहेत, त्यामुळे घोषणा होईपर्यंत मी जास्त काही बोलू शकत नाही. हा एक मोठा प्रोजेक्ट आहे, सध्या एवढंच सांगू शकते.

पॅरिसच्या डिओर फॉल-विंटर हाउतेमध्ये Sonam Kapoor जलवा; सर्वांना केले चकित

दरम्यान, मणिरत्नम यांचा ‘कदल’ हा सिनेमा 2013 मध्ये रिलीज झाला. या सिनेमात गौतम कार्तिक, अर्जुन सरजा, अरविंद स्वामी, तुलासी नायर आणि लक्ष्मी मंचु ही कलाकार मंडळी झळकली होती. तर, सोनमने 2007 मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या ‘सावरिया’ या सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं.

follow us