Sonu Nigam कडून बिटर बिट्रेयल्सची घोषणा ‘अच्छा सिला दिया’ च्या आठवणींना उजाळा

Sonu Nigam : गायक सोनू निगम आणि भूषण कुमार यांनी त्यांच्या आगामी गाण्याची घोषणा केली आहे. ‘बिटर बिट्रेयल्स’ असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्यामुळे ‘अच्छा सिला दिया’ गाण्याच्या आठवणींना उजाळा मिळणार असल्याचं बोललं जात आहे. कारण ते सोनू निगमच्या करियरच्या सुरूवातीच गाणं होतं. तर तेच गाणं आता बिटर बिट्रेयल्सच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं […]

Untitled Design (5)

Untitled Design (5)

Sonu Nigam : गायक सोनू निगम आणि भूषण कुमार यांनी त्यांच्या आगामी गाण्याची घोषणा केली आहे. ‘बिटर बिट्रेयल्स’ असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्यामुळे ‘अच्छा सिला दिया’ गाण्याच्या आठवणींना उजाळा मिळणार असल्याचं बोललं जात आहे. कारण ते सोनू निगमच्या करियरच्या सुरूवातीच गाणं होतं. तर तेच गाणं आता बिटर बिट्रेयल्सच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मस्तच! सलग पाच दिवसांची सुट्टी जाहीर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय

बिटर बिट्रेयल्स हे ‘अच्छा सिला दिया’ चं एक सादरीकरण आहे. तसेच त्याची निर्मिती टी- सिरीजचा नवा प्लॅटफॉर्म सोलोजद्वारे निर्मित केलं जाणार आहे. सोलोज या प्लॅटफॉर्मचं देखील हे पहिलंच गाणं असणार आहे. शुक्रवारी 29 सप्टेंबरला हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान या गाण्यावर गायक सोनू निगम आणि भूषण कुमार या दोघांनी देखील भावना व्यक्त केल्या आहेत.

Ashok Chavan : ‘तारीख पे तारीख मिलती है लेकिन’.. सरकारच्या कारभारावर चव्हाणांचा फिल्मी डायलॉग

सोनू निगम म्हणाला, मी काही दिवसांपासून माझ्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगू इच्छित आहे. मला वाचत आता ती योग्य वेळ आली आहे. ज्या प्रमाणे माझ्या करियरच्या सुरूवातीच गाणं ‘अच्छा सिला दिया’ या गाण्याला चाहत्यांनी प्रतिसाद दिला होता. त्याच गाण्याची जादू परत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. तेच आता बिटर बिट्रेयल्सच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मला आशा आहे की, तुम्ही त्याला पहिल्यापेक्षा जास्त प्रतिसाद द्याल. त्यामुळे आता प्रेक्षकांनी सोनू निगमच्या करियरच्या सुरूवातीच गाणं ‘अच्छा सिला दिया’ गाण्याची जादू अनुभवायला मिळणार आहे.

Exit mobile version