मुंबई : प्रसिद्ध गायक सोनू निगमला धक्का-बुक्की झाल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील चेंबूर फेस्टिवल या लाईव शो दरम्यान ही धक्का-बुक्की करण्यात आली आहे. या धक्का-बुक्कीचा व्हिडीओ सध्या सोशन मिडीयावर व्हायरल होत आहे. या धक्का-बुक्कीनंतर सोनू निगमला जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये त्याच्या टीम मधील एक जम जखमी झाला आहे.
Singer Sonu Nigam who raised his voice about Azan Loudspeakers attacked by Janab Uddhav Thackeray MLA Prakash Phaterpekar and his goons in music event at Chembur. Sonu has been taken to the hospital nearby. pic.twitter.com/32eIPQtdyM
— Sameet Thakkar (@thakkar_sameet) February 20, 2023
मुंबईतील चेंबूर फेस्टिवलचा शेवटचा दिवस होता. यावेळी लाईव शो दरम्यान सोनू निगम परफॉर्मन्समनंतर स्टेजवरून खाली येत असताना चाहत्यांनी सेल्फीसाठी गर्दी केली. या दरम्यान धक्का-बुक्की झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर तात्काळ बॉडीगार्ड्सने सोनू निगमला यातून वाचवलं.
Maharashtra Politics : शिवसेना आमचीच अन् शिवसेना भवनावर…, मुख्यमंत्री शिंदेंनी ठणकावून सांगितलं
दरम्यान असं सांगितलं जात आहे की, आमदार प्रकाश फातेरपेकर यांच्याकडून या चेंबूर फेस्टिवल आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांचा मुलगा स्वप्नीलने सोनूची मॅनेजर सायराशी उद्धटपणे वागला होता. त्यानंतर सोनू निगम स्टेजवरून खाली उतरत असताना त्याने सोनूच्या बॉडीगार्ड्ला धक्काबुक्की केली आणि त्यानंतर सोनूलाही धक्काबुक्की केली. त्यात सोनूचा मुलगाही खाली कोसळल्याचं सांगण्यात येत आहे.
त्यानंतर सोनू निगमने थेट चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तर आता या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू झाला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सोमवारी रात्री 11 च्या सुमारास ही घटना घडली. या धक्का-बुक्की करणाऱ्यांची अद्याप ओळख पटली नसल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.