Download App

Sonu Sood: सामन्याचा ‘मसिहा’ सोनू सूदचा क्लासी प्रो जिम लूक पाहिलात का?

Sonu Sood: सोनू सूद हा एक अष्टपैलू अभिनेता तर आहेच, (Social media) त्याबरोबरच सामाजिक भान जपणारा सामन्याचा “मसिहा” देखील आहे. अभिनयाच्या सोबतीने मानवतावादी प्रयत्नांनीच नव्हे तर जिममध्ये जाऊनही त्याने त्याच्या हटके जिम लूकने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. वर्कआउट (Workout) वॉर्डरोब हा त्याच्या कम्फर्ट आणि तितकाच फॅशनेबल आहे.


तो सातत्याने फिटनेस कडे लक्ष देऊन कायम जमेल तेवढं वर्कआऊट करून फिट राहण्याचा प्रयत्न करत असतो. तसेच सोनूच्या या सोशल मीडिया पोस्टने सगळ्याच फॅन्स ना फिटनेसच महत्त्व तर दाखवून दिलं आहे. परंतु फिटनेस सोबत फॅशनमध्ये राहून कायम फिट राहण्याची प्रेरणा सोनू देत असतो. त्याच्या आगामी मॅग्नम ओपस फतेहसाठी तो खूप उत्तम प्रशिक्षण घेऊन स्वत: ला या रोलसाठी तयार करत आहे.

https://www.youtube.com/watch?v=6T2Jqhk8vEI

सोनू सूद त्याच्या वर्कआऊट लूकमध्ये एकदम क्लासी बघायला मिळत आहे. त्याचा निर्दोष फॅशन सेन्स त्याच्या जिम लूकमध्ये अगदीच वेगळी जादू निर्माण करतेय आणि फिटनेस प्रेमींना प्रेरित करत आहे. तसेच गेल्या काही दिवसाखाली मनोरंजन आणि व्यवसाय ब्रिजिंग स्टार-स्टडेड इव्हेंटमध्ये मोस्ट स्टायलिश उद्योजक पुरस्कार त्याने पटकावला आहे. कोरोना काळात (COVID19) त्याने लोकांना केलेली मदत उल्लेखनीय ठरली.

Sonu Sood: सोनू सूद ठरला ‘मोस्ट स्टायलिश उद्योजक’

पुरस्कार सोहळ्यात सोनू सूदने आत्मविश्वास घेरून प्रेक्षकांची कायम मन जिंकली. (Social media) कार्यक्रमस्थळी टाळ्यांचा कडकडाट होताच सोनू सूदचा विजय हा केवळ स्टाईलचा उत्सव नव्हता, हे सगळ्यांना कळून आल्याचे बघायला मिळत आहे. सोनू सूदचा मोस्ट स्टायलिश उद्योजक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे.

Tags

follow us