Download App

Sonu Sood ही झाला डीपफेकचा शिकार; तोतयाकडून पैशांची गरज असलेल्या कुटुंबाला फसवण्याचा प्रयत्न

Sonu Sood : अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) त्याच्या अभिनयाबरोबरच समाजकार्याने त्याने घेतलेल्या भूमिकांमुळे देखील चर्चेत असतो. यावेळी मात्र तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.सोनूला नुकताच एका फॉलोअरकडून डीपफेक व्हिडिओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग मिळाल्याने त्याला मोठा धक्का बसला.

पुन्हा दिसला हृतिक रोशनचा जलवा; ‘फाइटर’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगनेही मोडला रेकॉर्ड!

या व्हिडीओमध्ये बनावट सोनू सूदने वैद्यकीय उपचारांसाठी निधीची गरज असलेल्या कुटुंबाशी संवाद साधला, त्यांना आर्थिक मदतीचे आश्वासन दिले. कारण सोनू अशाच प्रकारे नेहमी लोकांना मदत करत असतो. मात्र या तोतया व्यक्तीकडून व्हिडिओ कॉलद्वारे चॅटिंग करून उपचारांसाठी निधीची गरज असलेल्या कुटुंबाकडून कोणीतरी पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जात होता.

हा व्हिडीओ एका चाहत्याने सोनूला पाठवला. त्यानंतर लगेगच सोनूने त्याच्या सोशल मिडीया अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्याचे केलं आवाहन. यामध्ये कॅप्शन देताना सोनू म्हणाला की, माझा चित्रपट फतेह वास्तविक जीवनातील घटनांनी प्रेरित आहे. ज्यामध्ये डीपफेक आणि बनावट कर्ज अॅप्स आहेत. सोनू सूद असल्याचे भासवून त्यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे चॅटिंग करून कुटुंबाकडून कोणीतरी पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याची ही ताजी घटना आहे. अनेक निष्पाप व्यक्ती या सापळ्यात अडकतात. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की जर तुम्हाला असे कॉल येत असतील तर सावध रहा. #फतेह

’22 जानेवारीनंतर आमचं कलियुग सुरु होईल’; राम मंदिर मुद्द्यावरुन काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान

विशेष म्हणजे अशा घटनांपासून प्रेरित होऊन अभिनेता त्याच्या नवीन थ्रिलर फतेहसाठी लेखक आणि दिग्दर्शक बनला आहे. दीड वर्षांच्या संशोधनानंतर आणि सायबर क्राइम पोलिस अधिकारी आणि नैतिक हॅकर्स यांच्या मुलाखती घेतल्यानंतर सूदने ही कथा लिहिली. देशाचे सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण करण्याच्या मोहिमेवर असलेल्या तंत्रज्ञान-जाणकार तपास एजंटची भूमिका साकारणार आहे.

follow us