Sonu Sood : अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) त्याच्या अभिनयाबरोबरच समाजकार्याने त्याने घेतलेल्या भूमिकांमुळे देखील चर्चेत असतो. यावेळी देखील त्याने अशीच एक भूमिका घेत एअरलाईन स्टाफला पाठिंबा दिला आहे. त्याचं झालं असं की, थंडी आणि धुक्यामुळे अनेक फ्लाइट्सना उशीर होत आहे त्यामुळे प्रवाशांकडून एअरलाइन्सवर टीका होत आहे.
आठवले, जानकर, बच्चू कडू आणि सदाभाऊ यांची अवस्था कढिपत्त्यासारखी!
या दरम्यानच दिल्लीवरून गोव्याला जाणाऱ्या एका फ्लाईटला थंडी आणि धोक्यामुळे जवळपास तीन तास उशीर झाला. त्यामुळे प्रवाशांचा राग अनावर झाला. एका प्रवाशाने विमानाच्या पायलट सोबतच धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अभिनेता सोनू सूदने एअरलाइन्स कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ एक पोस्ट लिहिली.
..तरच अपात्रतेचा निर्णय मागे घेतला जाऊ शकेल; राहुल नार्वेकरांचे सूचक वक्तव्य
या पोस्टमध्ये सोनू म्हणाला की, मी देखील विमान उशिराने उड्डाण घेणार असल्याने तीन तास विमानतळावर अडकून होतो. मात्र आपण एअरपोर्ट कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांशी धीराने वागलं पाहिजे. कारण वातावरण खराब असणं त्यांच्या हातात नाहीये. मी देखील तीन तासांपासून एअरपोर्टवर शांततेत माझ्या फ्लाईटची वाट पाहत आहे. प्रवासासाठी उशीर होणं समजू शकतो. मात्र एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांसोबत नम्रपणे वागा. कारण प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते. फ्लाईटला उशीर पायलट किंवा एअरलाइन्स कर्मचाऱ्यांमुळे होत नाही.
तर दुसरीकडे या अगोदर देखील अनेक सेलिब्रिटींनी अशाप्रकारे त्यांना देखील विमान प्रवास करताना आलेल्या अडचणी शेअर केल्या यामध्ये अभिनेत्री राधिका आपटेने देखील नुकतीच एक पोस्ट केली होती ज्यामध्ये ते म्हटले होते की तिच्या फ्लाईटला दोन तास उशीर झाला. या सर्व सेलिब्रेटींच्या विरूद्ध प्रतिक्रीया सोनू सूदने दिली.
आता अभिनेता त्याच्या आगामी चित्रपट ‘फतेह’साठी (Fateh Movie) दिग्दर्शनाच्या भूमिकेत उतरला आहे. हा चित्रपट या वर्षात रिलीज होणार असून आज देशभरात होत असलेल्या सायबर गुन्ह्यांवर बारकाईने नजर टाकणार आहे. वास्तविक जीवनातील घटनांवर आधारित डिजिटल युगातील सायबर धोक्यांवर प्रकाश टाकून प्रेक्षकांचं मनोरंजन करणे आणि साध्या सोप्या पद्धतीने ते कसं टाळता येणार आहे, हे या चित्रपटाचे उद्दिष्ट आहे. सोनूने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करून कॅप्शन दिल आहे. ‘फतेह’ हा माझ्यासाठी खास आणि वैयक्तिक चित्रपट आहे. विविध स्तरांवर सायबर गुन्ह्यांचा बळी ठरलेल्या तरुणांना ही श्रद्धांजली आहे.