Download App

प्रसिद्ध अभिनेत्रीने अवघ्या 24 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मृत्यूचं कारण थक्क करणारं

Lakshmika Sajeevan Died: मल्याळम सिनेसृष्टीतील अभिनेत्री लक्ष्मीका सजीवन (Lakshmika Sajeevan) हिने वयाच्या 24 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. शुक्रवारी संयुक्त अरब अमिराती येथील शारजाहमध्ये लक्ष्मीका सजीवन हिचं निधन झालं. (Lakshmika Sajeevan Died) मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीका हिचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. अभिनेत्रीच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, तिचा दुबईत मृत्यू झाला, याठिकाणी ती काही महत्त्वाच्या कामासाठी गेली होती. अभिनेत्रीच्या निधनानंतर इंडस्ट्रीतील लोक सोशल मीडियावर तिला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

लक्ष्मीकाने अगदी लहान वयातच तिच्या अभिनयातून मोठे यश मिळवले होते. ती मल्याळम इंडस्ट्रीतील एक मोठे नाव होते. ‘कक्का’ या लघुपटातील पंचमीच्या भूमिकेसाठी ती ओळखली जात होती. या व्यक्तिरेखेसाठी तिला चांगलीच पसंती मिळाली होती. हा लघुपट ओटीटीवर आला होता. यामध्ये ती एक कुरूप गडद त्वचेची मुलगी दाखवण्यात आली होती, यामध्ये तिचे दात बाहेर होते आणि लोक तिच्या लूकची खिल्ली उडवत होते.

Leelavathi Death: अभिनेत्री लीलावती यांचे निधन, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली

अभिनेत्री लक्ष्मीका सजीवन हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, लक्ष्मीकाने तिच्या कारकिर्दीत ‘पंचवर्णथा’, ‘उयारे’, ‘पुढायम्मा’, ‘सौदी वेल्लाक्का’, ‘ओरू कुट्टनादन ब्लॉग’, ‘ओरू यमंदन प्रेमकथा’ आणि ‘नित्यहरिथा नायगन’ यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आणि तिचा शेवटचा ‘कून’ या चित्रपटात बघायला मिळाली होती.

Tags

follow us