Nayanthara: “आणखी किती फोटो काढणार?” चाहत्यावर नयनतारा भडकली

Nayanthara : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील (South Actress) लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) आणि तिचा पती दिग्दर्शक विग्नेश शिवन (Vignesh Shivan) मागील काही दिवसांपासून सतत चर्चेमध्ये येत आहे. (Temple) या दोघांनी जुळ्या मुलांचे आई-बाबा झाल्याची घोषणा केल्यावर ते दोघेदेखील चांगलेच चर्चेत आले आहे. लग्नानंतर अवघ्या ४ महिन्यांनी त्यांच्या घरी जुळ्या मुलांचा जन्म झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा चांगलाच धक्का बसला […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 10T124601.876

Nayanthara

Nayanthara : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील (South Actress) लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) आणि तिचा पती दिग्दर्शक विग्नेश शिवन (Vignesh Shivan) मागील काही दिवसांपासून सतत चर्चेमध्ये येत आहे. (Temple) या दोघांनी जुळ्या मुलांचे आई-बाबा झाल्याची घोषणा केल्यावर ते दोघेदेखील चांगलेच चर्चेत आले आहे. लग्नानंतर अवघ्या ४ महिन्यांनी त्यांच्या घरी जुळ्या मुलांचा जन्म झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा चांगलाच धक्का बसला आहे.


गेल्या काही दिवसांपासून नयनतारा तिचा पती विघ्नेश शिवनसह एका मंदिरामध्ये गेले होते. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते. पांगुनी उठीरामच्या निमित्ताने ही जोडी आपल्या कुटुंबाबरोबर मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले, पण यादरम्यान नयनतारा तिच्या एका चाहत्यावर चांगलीच भडकल्याचा व्हिडिओ व्हायरल समोर आला आहे.

नयनतारा त्या चाहत्यावर नेमकी का भडकली? याचे कारण देखील समोर आले आहे. जेव्हा नयनतारा आपल्या नवऱ्यासह मंदिरामध्ये दर्शन घेत होती, तेव्हा तिच्या काही चाहत्यांनी तिचा व्हिडिओ शूट करण्यास सुरुवात केला, त्यापैकी एका चाहत्यावर नयनतारा भडकली. नयनताराच्या परवानगी शिवाय तिचा व्हिडिओ बनवणे तिला आवडले नाही आणि तिला राग आला.

Ghungaru Teaser: सबसे कातील गौतमी पाटीलच्या ‘घुंगरु’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित

नयनताराचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, यावर चाहत्यांनी तिच्या या वागण्यावर मोठी नाराजी व्यक्त केली आहे. कुंभकोणमजवळील कामाक्षी अम्मान मंदिराला भेट देताना इतका त्रास होणार अशी अपेक्षा नयनतारा आणि तिचा पती विघ्नेश शिवन यांना नव्हती. जमावार नियंत्रण होत नसल्याने नयनताराचा संयम संपला. अभिनेत्रीने सरळ चाहत्याला ओरडायला सुरुवात केली, यामुळे मोठा गदारोळ झाला.

Gautami Patil : “मला लगीन कराव पायजे”, गौतमी पाटीलला कसा नवरा हवाय? म्हणाली…

संतप्त नयनताराने चाहत्याचा फोन तोडण्याची देखील धमकी दिली, तिचा पती विघ्नेश शिवन नंतर हे प्रकरण हाताळताना दिसून आला, तर पोलिसांनी देखील गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होते. नयनतारा ही साऊथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. नयनतारा शेवटची हॉरर थ्रिलर ‘कनेक्ट’ या चित्रपटामध्ये दिसली होती. सध्या तिचा ‘जवान’ हा चित्रपट मोठ्या चर्चेत आहे. यामध्ये ती पहिल्यांदा किंग खान शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर करत असल्याचे दिसून आली आहे. तिच्या या चित्रपटासाठी चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Exit mobile version