Download App

दाक्षिणात्य ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री दिसणार ‘रानटी’ चित्रपटात, साकारणार महत्वाची भूमिका

Shanvi Srivastava : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ या आगामी मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. यातच

  • Written By: Last Updated:

Shanvi Srivastava : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ या आगामी मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. यातच आता या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. माहितीनुसार, ‘रानटी’ चित्रपटातून दक्षिणची अभिनेत्री शान्वी श्रीवास्तव (Shanvi Srivastava) मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे.

नुकतंच शान्वीच्या भूमिकेचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. ‘रानटी’ हा मराठीतला सगळ्यात मोठा अ‍ॅक्शनपट 22 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती पुनीत बालन स्टुडिओकडून करण्यात येत आहे तर समित कक्कड या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे. त्यामुळे प्रेक्षकांना काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे शान्वी श्रीवास्तवची दक्षिण भारतात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. तेलुगू चित्रपट लव्हली द्वारे 2012 तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते.

तर ‘अड्डा’,‘प्यार में पडीपोयने’,‘भले जोडी’,‘मुफ्ती’,‘चंद्रलेखा’ यासारख्या दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये तिने उत्तम काम केलं आहे. तर आता शान्वी ‘रानटी’ चित्रपटात मैथिली या महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याने तिने आनंद व्यक्त करत दिग्दर्शक समित कक्कड सारख्या नावाजलेल्या दिग्दर्शकासोबत काम करण्याचा अनुभवही कमालीचा असल्याचं तिने म्हटले आहे.

Ashutosh Kale : मोठी बातमी! राष्ट्रवादीकडून आ.आशुतोष काळेंची उमेदवारी जाहीर

रानटी या चित्रपटाच्या माध्यमांतून तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘रानटी’ चित्रपटासाठी हृषिकेश कोळी यांचं लिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहस दृष्ये, सेतु श्रीराम यांचं फोटोग्राफीक्स, आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम चित्रपटाला लाभलेली आहे.

follow us