Download App

‘स्पंद अंतरीचे’ हे प्रत्येकाच्या मनातील प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला

Spand Antriche : कपाटावरून किंवा एखाद्या संदुकीतून ५० वर्षांपूर्वीचा जुना अल्बम काढला की, काही क्षण का होईना तो अल्बम आपल्याला त्या काळात

  • Written By: Last Updated:

Spand Antriche : कपाटावरून किंवा एखाद्या संदुकीतून 50 वर्षांपूर्वीचा जुना अल्बम काढला की, काही क्षण का होईना तो अल्बम आपल्याला त्या काळात घेऊन जातो. मग नकळत त्या आठवणींमध्ये आपण रमतो. काही आठवणी नव्याने उलगडतात. त्या फोटोंवरून हात फिरवताना कित्येक वर्षं पुन्हा जगली जातात असेच जुन्या आठवणींमध्ये रममाण करणारे ‘स्पंद अंतरीचे…’ (Spand Antriche) हे प्रत्येकाच्या मनातील प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

केदार जोशी, अभय अनंत कोर्डे निर्मित, या गाण्याचे दिग्दर्शन तेजस नेरुरकर यांनी केले आहे. प्रियदर्शिनी इंदलकर हिच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या सुंदर गाण्याला शमिका भिडे हिचा सुमधुर आवाज लाभला असून अभय अनंत कोर्डे यांचे गीत, संगीत लाभलेल्या या गाण्याला अमित पाध्ये यांचे संगीत नियोजन आहे. कृष्णधवल सिनेमाच्या जमान्यातील बऱ्याच गाण्यांनी पिढ्यानपिढ्या रसिकांच्या मनावर राज्य केले आहे.

ती गाणी, त्यातील साधेपणा स्वप्नवत वाटणारा असतो. असेच जुन्या आठवणींना उजाळा देणारे हे गाणे मनातील हितगूज व्यक्त करणारे आहे. या गाण्याबद्दल निर्माते केदार जोशी, अभय अनंत कोर्डे म्हणतात, ” धावपळीत गुंतलेल्या मनावर शांततेची हळुवार फुंकर घालणारे हे गाणे असून घड्याळालाही मागे टाकेल इतक्या सुपरफास्ट स्पीडमध्ये चाललेल्या आजच्या युगात, थोडं थांबवून कृष्णधवल छटांमध्ये काही काळ घेऊन जाण्याचा आमचा हा प्रयत्न आहे “.

यात प्रियदर्शिनीचा सहजसुंदर अभिनय पाहायला मिळेल. या गाण्याचे दिग्दर्शन तेजस नेरुरकर या प्रसिद्ध फोटोग्राफरने केले असून पदार्पणातच इतके कमाल दिग्दर्शन करणे, निश्चितच कौतुकास्पद आहे. आम्हाला खात्री आहे.

काळा घोडा कला महोत्सवाचे रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण, राहुल देशपांडे यांच्या मैफिलीचे आयोजन

हे गाणे प्रत्येकाच्या जुन्या आठवणींना उजाळा देईल.” तर तेजस नेरुरकर म्हणतात, ” सिनेमॅटोग्राफी बऱ्याच वेळेला करायला मिळते पण या गाण्याच्या माध्यमातून परत एकदा दिग्दर्शनाचा प्रयत्न करून पहिला आहे. टीम खूप छान असल्यामुळेच अनेक अडथळे येऊनही शूटिंग व्यवस्थित झाले. ”

follow us

संबंधित बातम्या