Sukh Kalale : स्पृहा जोशी झळकणार नव्या मालिकेत, प्रोमोने वेधलं लक्ष

Spruha Joshi In Marathi Serial : महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी कलर्स मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा खजिना घेऊन अवतरत आहेत. (Marathi Serial) ‘इंद्रायणी’नंतर आता लवकरच “सुख कळले” (Sukh Kalale Serial ) ही आणखी एक नवीन मालिका कलर्स मराठी घेऊन येत आहे. नुकताच या मालिकेचा टीजर प्रदर्शित झाला असून “ सुख कळले”च्या पहिल्याच टीजरने प्रेक्षक खूप सुखावले आहेत. […]

Sukh Kalale मध्ये आशय कुलकर्णीची दमदार एन्ट्री; सौमित्र आणणार रंजक वळण

Sukh Kalale

Spruha Joshi In Marathi Serial : महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी कलर्स मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा खजिना घेऊन अवतरत आहेत. (Marathi Serial) ‘इंद्रायणी’नंतर आता लवकरच “सुख कळले” (Sukh Kalale Serial ) ही आणखी एक नवीन मालिका कलर्स मराठी घेऊन येत आहे. नुकताच या मालिकेचा टीजर प्रदर्शित झाला असून “ सुख कळले”च्या पहिल्याच टीजरने प्रेक्षक खूप सुखावले आहेत.


याचे कारण रसिकांची लाडकी अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi ) पुन्हा कलर्स मराठीवर झळकणार आहे. तसंच स्पृहा बरोबर गुणी आणि चोखंदळ अभिनेता सागर देशमुख असणार आहे. सध्या तरी ही मालिका कधी सुरु होणार, हे गुलदस्त्यात असले तरी या पहिल्याच सुंदर टीजरने रसिकांना सुखद धक्का दिला असून प्रेक्षकांच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहेत.

‘लापता लेडीज’चा धुमाकूळ, कमी बजेटच्या सिनेमानं 11 दिवसांत कमावले तब्बल इतके कोटी

स्पृहा जोशी आणि सागर देशमुख हे दोन्ही तगडे कलाकार प्रथमच एकत्र येत असून ही दमदार जोडी लोकांच्या पसंतीस उतरते आहे. “सुख कळले” ही एक वास्तवदर्शी मालिका असून स्पृहा- सागर आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवायला पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत.

प्रोमोमधील तरल भावस्पर्शी क्षण या दोघांमधील नाते अधोरेखित करत आहे. त्यामुळे ही एक मध्यमवर्गीय कुटुंबाची हृदयस्पर्शी कहाणी असून जी प्रेक्षकांना तुफान भावते आहे.

Exit mobile version