100th All India Marathi Divisional Drama Conference : 100 वे विभागीय अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या तयारीचा शुभारंभ झाला असून, सारडा महाविद्यालय येथे रंगमंच उभारणीच्या कामाला सुरुवात झाली असून संमेलनाचे निमंत्रक आमदार संग्राम जगताप, स्वागताध्यक्ष डॉ.बापूसाहेब कांडेकर, तसेच राजाभाऊ अमरापूरकर, सुमतीलाल कोठारी, प्रसाद बेडेकर, क्षितिज झावरे, पी.डी. कुलकर्णी, चैत्राली जावळे, शशिकांत नजन, अभय गोले, अमोल खोले, वैभव कुऱ्हाडे, चंद्रकांत सेंदाने, आयुब खान, संतोष ताठे , इम्रान शेख , प्रशांत जठार सागर म्हेत्रे, जालिंदर शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर नाट्यकर्मी उपस्थित होते.
संपूर्ण राज्यभरातून रंगकर्मी आणि नाट्यप्रेमींना एकत्र आणणारे हे मेलनसं शहरातील सांस्कृतिक परंपरेचे महत्त्व अधोरेखित करणार आहे. रंगमंचाच्या उभारणीपासूनच वातावरणात उत्साह जाणवत असून, विविध नाट्य सादरीकरणांसह कला व साहित्यावर चर्चा करण्याचे व्यासपीठ म्हणून हे संमेलन विशेष ठरणार आहे असे यावेळी क्षितिज झावरे म्हणाले.
तसेच 100वे नाट्य संमेलन नगरसारख्या सांस्कृतिक वारसा लाभलेल्या शहरात होणे हे नगरकरांसाठी अभिमानास्पद आहे. 22 जानेवारी पासून हे नाट्य संमेलन सुरु झाले असून 26 व 27 जानेवारी रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी होणार आहे. आपल्या शहरात अनेक कलाकार घडले असून नाट्य चळवळीचा वारसा लाभला आहे. हे नाट्य संमेलन युवा नाट्य कलाकारांसाठी विश्वास व दिशा देणारे ठरेल असे झावरे म्हणाले.
अजितदादांचं मिशन स्थानिक स्वराज्य संस्था; कार्यकर्त्यांना दिलं खास टार्गेट!
यावेळी प्रसाद बेडेकर यांनी नाट्य रसिकांना मोठ्या संखेने उपस्थित राहण्याचे आवाहन केले उपस्थितांनी संमेलन यशस्वी होण्यासाठी सहकार्याचे आवाहन केले. सांस्कृतिक उत्सवाची सुरुवात करणाऱ्या या नाट्य संमेलना बद्दल नाट्य प्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता लागली आहे.