Striking posters of Sanjay Leela Bhansali’s ‘Love & War’ unveiled! Vicky Kaushal’s new avatar revealed : संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित ‘लव्ह अँड वॉर’ हा वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक असून, भारतीय चित्रपटसृष्टीत नवा मापदंड प्रस्थापित करण्यासाठी सज्ज आहे. रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल हे तीन आघाडीचे कलाकार पहिल्यांदाच एका भव्य एसएलबी चित्रपटासाठी एकत्र येत असल्याने, हा चित्रपट एक आगळावेगळा सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच, निर्मात्यांनी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे फर्स्ट-लुक पोस्टर्स प्रेक्षकांसमोर आणले होते. या पोस्टर्सनी सोशल मीडियावर अक्षरशः वादळ निर्माण करत प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळवले. आता विकी कौशलचा फर्स्ट-लुक पोस्टर प्रदर्शित करण्यात आला असून, त्याचा हा लुक पाहून प्रेक्षक अक्षरशः थक्क झाले आहेत.
हातात सिगारेट आणि लायटर, चेहऱ्यावर तीव्र नजर आणि व्यक्तिमत्त्वात एक वेगळीच धार — विकी कौशल आपल्या फर्स्ट लुकमध्ये अत्यंत प्रभावी दिसत आहे. या व्यक्तिरेखेला त्याने एक वेगळीच धार आणि दमदार उपस्थिती दिली आहे. यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अशा अंदाजात विकी कौशल दिसत असून, त्याचा हा लुक निश्चितच लक्ष वेधून घेतो. पोस्टर सर्व काही सांगून जाते — एखादा कलाकार जेव्हा भन्साळींच्या नायकाच्या विश्वात प्रवेश करतो, तेव्हा तो एका अनपेक्षित आणि वेगळ्याच रूपात समोर येतो. विकीचा हा लुक याच गोष्टीची साक्ष देतो. त्याच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वासोबत त्याची तीव्र नजर जेव्हा एकरूप होते, तेव्हा एसएलबींच्या फर्स्ट लुकमधून निर्माण होणारी हीच ती जादू म्हणावी लागेल.
परीक्षेच्या तारखेवरून MPSC मध्ये काय चाललंय? रोहित पवारांनी चॅटचा स्क्रीनशॉट दाखवत उपस्थित केला सवाल
रणबीर, आलिया आणि आता विकी — ‘लव्ह अँड वॉर’च्या तिन्ही फर्स्ट-लुक पोस्टर्सनी या चित्रपटाच्या विश्वाची तीन वेगवेगळी रूपं प्रेक्षकांसमोर आणली आहेत. प्रत्येक पोस्टरमध्ये एक वेगळी व्यक्तिरेखा, व्यक्तिमत्त्व आणि दृश्यभाषा पाहायला मिळते. विशेषतः विकीच्या पोस्टरमधून या चित्रपटाच्या विश्वाला एक जबरदस्त तीव्रता प्राप्त होते. त्यातून संजय लीला भन्साळी या चित्रपटाच्या माध्यमातून साकारत असलेल्या गुंतागुंतीच्या आणि थरारक विश्वाची तसेच व्यक्तिरेखांमधील रंजक समीकरणांची झलक पाहायला मिळते. ‘लव्ह अँड वॉर’ हा संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट असून, यात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २१ जानेवारी २०२७ रोजी जगभरात हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
