Subhedar Box office Collection : ‘सुभेदार’ (Subhedar) हा ऐतिहासिक सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला आहे. शिवप्रेमी गेल्या काही दिवसांपासून या सिनेमाची चांगलीच प्रतीक्षा करत होते. अखेर 25 ऑगस्ट 2023 दिवशी हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला. प्रदर्शित झाल्याच्या विकेंडला दिवशी ‘सुभेदार’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
आधे इधर, आधे उधर, ठाकरेंची अवस्था शोलेतल्या जेससारखी; आशिष शेलारांची टीका
मिळालेल्या माहितीनुसार, ‘सुभेदार’ (Subhedar) या मराठी बहुचर्चित सिनेमाने पहिल्या विकेंडला पाच कोटींहून अधिक कमाई केली आहे. ‘सुभेदार’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच जादू दाखवली आहे. उत्तम कथा, पटकथा, दमदार संवाद, तगडी स्टारकास्ट आणि त्यांचा कमाल अभिनय, तंत्रकुशल टीम आणि चांगले दिग्दर्शन अशा सर्व गोष्टी जुळून आल्याने शिवराज अष्टकातलं पाचवं पुष्प चाहत्यांच्या जोरदार पसंतीस उतरलं आहे. ‘सुभेदार’ हा सिनेमा 350 पेक्षा जास्त सिनेमागृहांतील 900 पेक्षा जास्त शोजसह देशातल्या अनेक शहरांत आणि इतर 6 देशांत प्रदर्शित करण्यात आला आहे.
“तुझ्या तोंडात साखर पडो” : सुपर पालकमंत्रीपदावर अजितदादांचे सेफ अन् मिश्किल उत्तर
शिवकालीन इतिहासातील अजरामर योद्धा असा ‘सुभेदार तानाजीराव मालुसरे’ यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा (Subhedar) ‘सुभेदार… गड आला पण सिंह गेला …’ हा सिनेमा आज संपूर्ण महाराष्ट्राभर प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या निमित्ताने लेखक-दिग्दर्शक-अभिनेता दिग्पाल लांजेकर (Director Digpal Lanjekar) यांनी परत एकदा रसिकांना शिवकालीन इतिहासात नेण्याचं शिवधनुष्य यशस्वीपणे सांभाळले आहे. (Subhedar Marathi Movie)
सध्या सर्वत्र या सिनेमावर कौतुकाचा वर्षाव होत आहे, (Subhedar Review) प्रेक्षकही या सिनेमाला प्रचंड उत्साहात ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा देत ‘सुभेदार…’गड आला पण सिंह गेला…’ पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. ‘सुभेदार’ हा सिनेमा ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यदलातील शूरवीर योद्धे सुभेदार तान्हाजीराव मालुसरे यांच्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यांवर प्रकाशझोत टाकणारा आहे.