Subhedar Movie New Record: राजा शिवछत्रपतींच्या सिनेमातील अष्टकांमध्ये आतापर्यंत ४ चित्रपुष्प चाहत्यांच्या भेटीला आले आहेत. फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड आणि शेर शिवराजच्या घवघवीत यशानंतर चाहत्यांच्या भेटीला पाचवे पुष्प येणार आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ (Subhedar) सिनेमा येत्या २५ ऑगस्ट दिवशी प्रदर्शित होणार आहे. सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम बघण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. नुकतंच सिनेमाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू होत असून सिनेमाने प्रदर्शनाअगोदरच परत एकदा एक अनोखा रेकॉर्ड केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. सिनेमाची घोषणा झाल्यापासून अनेकवेळा सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली होती. अखेर हा सिनेमा येत्या २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. नुकतंच सिनेमाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरू झाली आहे. सिनेमाला सिनेमागृहात जास्त प्राईम- टाईम उपलब्ध नसल्याचे दिसत आहे. जरी असं असलं तरी, प्रदर्शनाअगोदर बुक माय शो वर 40K+ इंटरेस्टेड लाईक्स मिळालेला पहिला मराठी सिनेमा ‘सुभेदार’ ठरला आहे.
सुभेदार सिनेमाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर ही पोस्ट करण्यात आली आहे. निर्मात्यांनी पोस्ट शेअर करत असताना कॅप्शनमध्ये सांगितले आहे की, “तुमच्या प्रेमामुळे ‘सुभेदार’ सिनेमाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ! प्रदर्शनाअगोदरच Book My Show वर 40K+ इंटरेस्टेड लाईक्स मिळालेला पहिला मराठी सिनेमा ‘सुभेदार’ !” सध्या या सिनेमाची टीम प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. रविवारी सिनेमाची टीम रविवारी सकाळी मरीन्स ड्राईव्हवर प्रमोशनसाठी गेले होते. त्यावेळी सिनेमाच्या टीमला भेटण्यासाठी असंख्य फॅन्सने मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
Video Viral: योगींच्या पाया का पडले? ट्रोल झाल्यावर थलायवा कारण सांगत म्हणाले…
‘सुभेदार’ या आगामी सिनेमात मृणाल कुलकर्णी जिजाऊ आईसाहेबांच्या, विराजस जीवाच्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. यशोदाबाई मालुसरेच्या भूमिकेमध्ये शिवानी रांगोळे दिसून येणार आहेत. फर्जंद, फत्तेशिकस्त अशा सिनेमातील अजय पुरकर यांच्या अभिनयाला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली आहे. आता अजय पुरकर यांच्या ‘सुभेदार’ या सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत असल्याचे बघायला मिळत आहे. ‘सुभेदार’ या सिनेमात चाहत्यांना तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा सुवर्ण इतिहास मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा दिग्पाल लांजेकर यांनी सांभाळली असल्याचे बघायला मिळत आहे. हा सिनेमा १८ ऑगस्ट २०२३ दिवशी सिनेमागृहात रिलीज होणार आहे.