Download App

Gadar 2: सनी पाजीचा ‘गदर2’ बॉक्स ऑफिसवर घालतोय धुमाकूळ; 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला चित्रपट

  • Written By: Last Updated:

Gadar 2 Box Office Collection: सनी पाजीचे चाहते ‘गदर २’ या सिनेमाला सध्या भरभरून प्रेम देत आहेत. ‘गदर २’ची दमदार कमाई पाहून आता निर्माते आणि कलाकार खूश झाल्याचे दिसत आहेत. बॉलिवूड अभिनेता सनी पाजी (Sunny Deol) याच्या ‘गदर २’ या सिनेमाची धमाकेदार कमाई अजून देखील सुरूच असल्याचे बघायला मिळत आहे. ( Box Office Collection) या सिनेमाने अनेक बिग बजेट सिनेमाना आता मागे टाकत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. ‘गदर २’बघण्यासाठी चाहते कायम सिनेमागृहामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.

या सिनेमाची जादू चाहत्यांच्या चांगलच मनावर पसरली आहे. ‘गदर २’चे रोजचे वाढणारे कलेक्शन बघता, आता हा सिनेमा नक्कीच नवा विक्रम करणार आहे, असा अंदाज वर्तविला जात आहे. आता या सिनेमाचे ८ दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. तसेच ‘गदर २’ने ३०० कोटींच्या क्लबमध्ये धमाकेदार एन्ट्री घेतल्याचे बघायला मिळाले आहे. सनी पाजीचे चाहते ‘गदर २’ या सिनेमाला उत्तमप्रकारे प्रतिसाद देत असल्याचे बघायला मिळत आहेत. ‘गदर २’ची गल्ला बघून आता निर्माते आणि कलाकार चांगलेच खूश झाल्याचे बघायला मिळत आहे.

Gadar 2 ची सातव्या दिवशी बम्पर कमाई; 300 कोटींचा पल्ला लवकरच गाठणार

दरम्यान ‘गदर २’चे ८ दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे. या सिनेमाने आता ३०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. सनी पाजी आणि अमीषा पटेल यांच्यासाठी हा पहिला विकेंड अतिशय हटके ठरल्याचे बघायला मिळत आहे. एका आठवड्यामध्ये या सिनेमाने २८३ कोटींचा गल्ला कमावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ‘गदर २’ या सिनेमाने दुसऱ्या आठवड्यामध्ये १९.५० कोटींचा व्यवसाय केल्याचे बघायला मिळाले आहे. तसेच सिनेमाची आतापर्यंतची कमाई ३०४.१३ कोटींच्यावर गेली आहे. परंतु हे केवळ प्राथमिक अंदाजे आकडे आहेत. तरी ही या सिनेमाने मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे.


आता दुसऱ्या आठवड्यात देखील हा सिनेमा एखादा अनोखा विक्रम रचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसऱ्या आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी या सिनेमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. ‘गदर २’ला या २ दिवसांचा खूप फायदा होण्याची शक्यता आहे. सनी पाजीच्या या सिनेमाची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ बघायला मिळत आहे. परंतु ‘गदर २’सोबत प्रदर्शित झालेल्या इतर सिनेमानं बॉक्स ऑफिसवर टिकून राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागल्याचे बघायला मिळाले आहे. तब्बल २२ वर्षांनी चाहत्यांच्या भेटीला आलेल्या ‘गदर २’ या सिनेमाने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकून घेतली आहेत.

Tags

follow us