Dono Trailer : राजवीर-पालोमाची लव्ह स्टोरी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ‘दोनों’चा ट्रेलर प्रदर्शित

Dono Trailer Launch: नवोदित दिग्दर्शक अवनीश एस बडजात्या यांच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर आणि गाण्याने लोकांच्या मनाला स्पर्श केला आहे. लोक नवोदित राजवीर देओल (Rajveer Deol) आणि पलोमा यांच्यातील केमिस्ट्रीकडे बघून आकर्षित झाले आहेत. तसेच सिनेमा प्रदर्शित होण्याची मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत. दरम्यान, निर्मात्यांनी जाहीर केले की हा चित्रपट 5 ऑक्टोबर दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार […]

Dono Trailer

Dono Trailer

Dono Trailer Launch: नवोदित दिग्दर्शक अवनीश एस बडजात्या यांच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर आणि गाण्याने लोकांच्या मनाला स्पर्श केला आहे. लोक नवोदित राजवीर देओल (Rajveer Deol) आणि पलोमा यांच्यातील केमिस्ट्रीकडे बघून आकर्षित झाले आहेत. तसेच सिनेमा प्रदर्शित होण्याची मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत.

दरम्यान, निर्मात्यांनी जाहीर केले की हा चित्रपट 5 ऑक्टोबर दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. एक भव्य डेस्टिनेशन वेडिंग ही पार्श्वभूमी असलेल्या या सिनेमामध्ये वधूचा मित्र देव (राजवीर) वराची मैत्रिण मेघना (पालोमा) हिला भेटतो. एका भव्य भारतीय विवाहादरम्यान, दोन अनोळखी व्यक्तींमध्ये एक हृदयाला स्पर्श करणारा प्रवास सुरू होतो. रोमान्स, रिलेशनशिप आणि प्रेम सेलिब्रेट करणाऱ्या सिनेमामध्ये शहरी कथा दाखविण्यात आली आहे.

राजश्री प्रॉडक्शन हाऊसने नवीन कलाकारांना लॉन्च करण्याचा 75 वर्षांचा वारसा सुरू ठेवला आहे. या प्रॉडक्शनमध्ये सर्वच माध्यमांमधून नवीन कलाकारांना आणि कलागुणांना वाव देण्यात आला आहे. राजश्री प्रॉडक्शन (पी) लिमिटेड अवनीश एस बडजात्या दिग्दर्शित जिओ स्टुडिओज “दोनों” च्या संयुक्त विद्यमाने आपला 59 वा सिनेमा सादर करत आहे.

800 Trailer: मुथय्या मुरलीधरनच्या बायोपिकचा टीझर झाला लॉन्च; ५ सप्टेंबरला सचिन करणार ट्रेलर प्रदर्शित

कमलकुमार बडजात्या, दिवंगत राजकुमार बडजात्या आणि अजितकुमार बडजात्या यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. सूरज आर. बडजात्या हे या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसरची धुरा सांभाळली आहे. “दोनों” तुमच्या जवळच्या सिनेमागृहात 5 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version