Download App

Sunny Leone: वाराणसीला पोहोचली सनी लिओनी, गंगा आरतीत नोंदवला सहभाग

Sunny Leone Visit Varanasi: अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) सध्या गायक अभिषेक सिंगसह (Abhishek Singh) तिच्या अलीकडील डान्स व्हिडिओच्या प्रमोशनसाठी अनेक ठिकाणी फिरत असताना सनी चक्क वाराणसीला (Varanasi ) जाऊन पोहचली आहे. वाराणसी सारख्या धार्मिक शहराला तिने भेट दिली आणि सोशल मीडियावर खास (Social media) पोस्ट शेयर केली आहे. केनेडी अभिनेत्रीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केल आणि ती या दौऱ्या दरम्यान खूपच सुंदर दिसत होती. गुलाबी सलवार सूटमध्ये ती अगदीच पारंपारिक भारतीय पोशाखात सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती. गंगा आरतीचा (Ganga Aarti) तिच्या लूकवर चाहते खूपच फिदा झाल्याचे बघायला मिळत आहे.


पवित्र नदीच्या काठावरील धार्मिक समारंभात सनीच्या उपस्थितीने चाहत्यांना मोहित केलं. सनीने हा सगळा अनुभव तिच्या सोशल मीडियावर शेयर केला आहे आणि त्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘वाराणसीमधला गंगा आरती पाहण्याचा सर्वात चांगला अनुभव. धन्यवाद!! @abhishek_as_it_is & @tseries.official….. गंगा आरतीमध्ये रूढी, परंपरांबद्दल चाहत्यांनी सनी लिओनीचे तोंडभरून कौतुक केले आहे. व्यावसायिक आघाडीवर सनी ‘ग्लॅम फेम’ वर जज म्हणून पदार्पण करण्याच्या तयारीत आहे, जो लवकरच जिओ सिनेमावर प्रीमियर प्रदर्शित होणार आहे. अनुराग कश्यपचा निओ-नॉयर थ्रिलर ‘केनेडी सोबतीला राहुल भट्ट अभिनीत, आणि तिचे तमिळ पदार्पण असलेला ‘कोटेशन गँग ‘ हा चित्रपट लवकरच येणार आहे.

सनी लवकरच तिच्या नवीन पार्टी साँगमध्ये दिसणार असून ‘थर्ड पार्टी’ अस या गाण्याचं नाव आहे. या गाण्याची निर्मिती टी सीरीजने केली आहे. नुकतचं या गाण्याचे पोस्टर टी सीरीजने इंन्साग्रामवर शेअर केला आहे. त्याला अनेकांनी लाईक्स आणि कमेंट केल्या. टी सिरीजने लिहिलं की, 15 नोव्हेंबरला गाणं रिलीज होणार आहे. रात्रीच्या लयीत नाचण्यासाठी सज्ज व्हा, असं कॅप्शन लिहिलं. या गाण्याच्या पोस्टवर सनी वेगळ्याच अंदाजात दिसत आहे.

Aaradhya Bachchan: ‘लेकीच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्या अन् अभिषेकनं शेअर केली खास पोस्ट

दरम्यान, प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ आणि सनी लिओनी यांचा तामिळ चित्रपट कोटेशन गँगही रिलीजसाठी सज्ज आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘कोटेशन गँग’ चे दिग्दर्शन विवेक कुमार कन्नन यांनी केले आहे. हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळमध्येही रिलीज होणार आहे. सनीचे चाहतेही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Tags

follow us