Download App

Sunny Leone करणार नव्या इंडस्ट्रीत प्रवेश; सांगितला ‘चिका लोका’ च्या ग्रॅंड ओपनिंगचा किस्सा

Sunny Leone : अभिनेत्री सनी लियोनी (Sunny Leone) ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे आणि नृत्यामुळे चर्चेत असते. त्याचबरोबर ती तिच्या सामाजिक कार्यासाठी देखील ओळखली जाते. मात्र यावेळी ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. हे कारण म्हणजे सनी आता तिचा नवा व्यवसाय सुरू करत आहे. काय आहे तिचा व्यवसाय? पाहूयात

…काय रे तू आमदार; स्वच्छतेवरून आईनेच अजित पवारांना चिमटा काढला !

सनीचा हा नवा व्यावसाय म्हणजे सनी एक हॉटेल सुरू करत आहे. 22 जानेवारी रोजी नोएडा येथील गुलशन वन 29 येथे सिंगिंग बाउल हॉस्पिटॅलिटीच्या साहिल बावेजा यांच्या सहकार्याने या हॉटेलचे उद्घाटन होणार आहे. ‘चिका लोका’ असं या हॉटेलचं नाव आहे. तसेच या हॉटेलबद्दल आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करत सनीने स्वतः माहिती दिली.

Sharad Pawar यांनी अतुल बेनकेंना पर्याय शोधला? काँग्रेस युवा नेते म्हटले पवारांनी संधी दिल्यास…

तिचं पहिलं हॉटेल सुरू करताना ती म्हणते ‘चिका लोका’ हा माझ्यासाठी नवा अनुभव असणार आहे. हॉटेल इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यासाठी मी उत्सुक तर आहेच पण हा नवा प्रवास अनुभवण्याची मी वाट बघत आहे. अभिनयाच्या सोबतीने ग्लॅमर वर्ल्डच्या पलिकडे जाऊन आता हा अनुभव घेणं नक्कीच कमालीचं असणार आहे. लोकांनी यांव इथल्या गोष्टी चा आस्वाद घ्यावा ही आमची इच्छा आहे” शेफ वैभव भार्गव यांनी तयार केलेले 7,000 स्क्वेअर फूट पसरलेले फ्लॅगशिप आउटलेट भारतीय, आशियाई, मेक्सिकन आणि इटालियन पाककृतींचे मिश्रण आहे. जागतिक फ्लेवर्स ची पर्वणी इकडे अनुभवता येणार आहे. “पोशन्स बाय सनी लिओनी ” हे खास बॉलीवूड कॉकटेल इकडे मिळणार आहे.

सनी चा ” चिका लोका ” हा हॉटेल इंडस्ट्रीत मधला प्रवास लवकरच सुरू होणार असून स्टेज, बार आणि टेरेससह ही जागा एक नेत्रदीपक ठिकाण आहे यात शंका नाही.गोवा, हैदराबाद आणि मुंबईमध्ये विस्तार करण्याच्या योजनांसह सनीचा हा खास उपक्रम 22 जानेवारी रोजी नोएडा येथील गुलशन वन 29 येथे सुरू होणार आहे. गॅस्ट्रोनॉमी आणि मनोरंजनाच्या या नवीन युगात विविध चवींचा आणि सनीच्या मनमोहक भावनेचा प्रवास सुरू करण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

follow us