Sunny Leone’s ‘Shantabai’ set to reach the audience! : आपल्या दिलखेचक अदांनी लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी बॉलीवूडची ‘बेबी डॉल’ सनी लिओनी आता एका भन्नाट आणि हटके मराठमोळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिच्या बहुचर्चित ‘शांताबाई’ या गाण्याची सध्या जोरदार चर्चा असून, गाण्याचा पूर्ण व्हिडिओ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
‘शांताबाई’च्या आधुनिक आणि झकास रूपातील सनी लिओनीचा ग्लॅमरस अंदाज, तिचे भन्नाट नृत्य आणि गाण्याचा जोशपूर्ण ठेका हे या गाण्याचे खास आकर्षण आहे. गाण्याच्या झलकांनी आधीच चाहत्यांची उत्सुकता वाढवली होती आणि आता संपूर्ण गाणे प्रदर्शित झाल्याने चाहत्यांना सनी लिओनीचा हा हटके मराठमोळा अंदाज पाहायला मिळत आहे.
या धमाकेदार गाण्याचे संगीत, गीत आणि गायन संजय लोंढे यांनी केले आहे. जोशपूर्ण संगीत आणि आकर्षक तालाला सनी लिओनीच्या दमदार नृत्याची साथ लाभल्याने ‘शांताबाई’ हे गाणे प्रेक्षकांसाठी खास मनोरंजनाची मेजवानी ठरत आहे. ‘शांताबाई’चा पूर्ण व्हिडिओ SKR Music and Movies या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाला असून, त्याचबरोबर हे गाणे सर्व प्रमुख संगीत आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाले आहे. त्यामुळे चाहत्यांनी हे धमाकेदार गाणे नक्की पाहावे आणि ऐकावे.
पूर्वी नास्तिक नव्हता, पण परिस्थितीनुसार…; विद्यानंद बापटांबद्दल वडिलांनी सांगितली खास गोष्ट
या चित्रपटात उषा नाडकर्णी, मंगेश देसाई, वीणा जामकर, सयाजी शिंदे, नागेश भोसले, सुनील गोडसे, सनी लिओनी, सपना चौधरी, आर्यन राठोड, गौतमी पाटील आणि मंगली यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दिग्गज कलाकारांच्या प्रभावी अभिनयामुळे चित्रपटाच्या आशयाला अधिक ताकद मिळाली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक, लेखक, पटकथाकार आणि निर्माते संजीव कुमार राठोड आहेत. क्रिएटिव्ह दिग्दर्शक शालिनी राठोड आणि क्रिएटिव्ह प्रोड्युसर आर्यन राठोड यांनीही चित्रपटाच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
समाजातील उपेक्षित घटकांचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारा आणि त्यांच्या न्यायाच्या लढ्याला व्यापक व्यासपीठ देणारा ‘द महाराष्ट्र फाईल्स’ आता प्राईम व्हिडिओवर उपलब्ध असून, अधिकाधिक प्रेक्षकांनी हा संवेदनशील आणि विचार करायला भाग पाडणारा चित्रपट आवर्जून पाहावा. ‘शांताबाई’* गाणे प्रदर्शित झाले आहे… आता सनी लिओनीच्या ‘आधुनिक शांताबाई’चा झकास जलवा पाहायला विसरू नका!
