सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारनचं लग्न ठरलं! ‘कोलावेरी डी’ फेम कंपोझरसोबत बांधणार गाठ

Sunrisers Hyderabad owner Kavya Maran आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय संगीतकार अनिरुद्ध रविचंदर सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.

Sunrisers Hyderabad Owner Kavya Maran

Sunrisers Hyderabad Owner Kavya Maran

Sunrisers Hyderabad owner Kavya Maran will tie the knot with Composer-singer Anirudh Ravichander : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांच्या लग्नाचे वारे पुन्हा एकदा जोरात वाहू लागले आहेत आणि या चर्चांना अधिक हवा मिळाली आहे ती अनिरुद्धचे जवळचे नातेवाईक आणि ज्येष्ठ तामिळ अभिनेते वाय. जी. महेंद्रन यांच्या एका विधानामुळे.

विधानपरिषद उपसभापतीपदासाठी शिवसेनेत रस्सीखेच; गोऱ्हेंसह आणखी दोन नावांची चर्चा

एका तामिळ चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत वाय. जी. महेंद्रन यांनी या नात्यावर शिक्कामोर्तब केल्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी अनिरुद्धचे कौतुक करत म्हटले की, मी त्याला खूप लवकरच होणाऱ्या एका मोठ्या लग्नासाठी आधीच शुभेच्छा देऊ इच्छितो. काव्या मारन यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, ती साधी मुलगी नाही; आपल्या वडिलांचा व्यवसाय आणि आयपीएलसारखी मोठी टीम सांभाळण्याची क्षमता तिच्यात आहे. त्यांच्या या विधानानंतर चाहते या दोघांच्या लग्नाची वाट पाहत आहेत.

WhatsApp चं यूजरनेम बुकिंग सुरू; आता नंबरशिवाय करता येणार चॅटिंग, वाचा डिटेल्स

विशेष म्हणजे, ही पहिलीच वेळ नाही की या दोघांच्या लग्नाची चर्चा रंगलीय. 2025 मध्येही सोशल मीडियावर अशाच प्रकारच्या अफवा पसरल्या होत्या. त्यावेळी अनिरुद्धने ‘एक्स’ (ट्विटर) वर पोस्ट करत या सर्व गोष्टी फेटाळून लावल्या होत्या आणि लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले होते. मात्र, आता स्वतः त्यांच्या कुटुंबातील सदस्याने यावर भाष्य केल्यामुळे चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय.

30 जूनची मुदत उलटल्याने शेतकरी कर्जमाफीला नवी डेडलाईन; कृषीमंत्री भरणेंची मोठी माहिती

दुसरीकडे, काव्या मारनचा प्रभाव पाहता, ती केवळ एक बिझनेसवूमन नाहीत, तर सन टीव्ही नेटवर्कची कार्यकारी संचालक आहेत. हुरुन इंडियाच्या रिपोर्टनुसार, सनरायझर्स हैदराबाद टीमची किंमत सुमारे 18 हजार कोटी रुपये आहे. काव्या ही कलानिधि मारन यांची कन्या असून, ती स्वतःच्या व्यावसायिक कौशल्यासाठी ओळखली जाते. तिच्याकडे रॉल्स रॉयस फँटमसारख्या लक्झरी गाड्यांचा ताफाही आहे.

कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने घट; भारतात इंधनाचे दर कमी होणार?

सध्या अनिरुद्ध किंवा काव्या या दोघांपैकी कोणीही यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, संगीत विश्वातील ‘स्टार’ आणि बिझनेस जगातील ‘पॉवरफुल’ व्यक्तीच्या या संभाव्य लग्नाची चर्चा सध्या मनोरंजन विश्वात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. आता हे नाते लग्नापर्यंत पोहोचते की नाही? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Exit mobile version