Suraj Chavan Started Pmotions Of Zhapuk Zhapuk Film : बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) आता मराठी सिनेसृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. सूरज चव्हाण लवकरच मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या ज्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. त्या चित्रपटाच्या (Japuk Jhapuk Film) प्रमोशनला आज मुहूर्त लागलाय.
मोरगावच्या गणपती बाप्पाचा आणि जेजुरीच्या खंडोबा देवाचा आशीर्वाद घेत सुरज चव्हाणने झापून झुपक सिनेमाच्या प्रमोशनची सुरुवात केली आहे. खंडोबा देवाच्या चरणी आज सूरजने आपल्या आगामी चित्रपटाचे पोस्टर ठेवून, (Marathi Movie)बाप्पाचा आशीर्वाद घेतला आहे. इतकंच नव्हे तर जिओ स्टुडिओज प्रस्तूत आणि केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटाची आज एक छोटीशी झलकही त्याने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करुन प्रेक्षकांच्या उत्सुकतेत भर घातली आहे.
दमदार टीझर प्रदर्शित, ‘ये रे ये रे पैसा 3’ चित्रपट ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
सूरज चव्हाणसोबत या चित्रपटात अनेक मराठी कलाकारांची वर्णी लागली आहे. जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे हे कलाकार (Entertainment News) मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. हालाकीच्या परिस्थितीतून वर येत सुरजने स्वतःच वेगळं असं छान विश्व तयार केलं. त्यामुळे सुरजचे चाहते त्याच्या ह्या नवीन प्रवासासाठी उत्सुक आहेत.
मोठी बातमी! पाकिस्तान सैन्याच्या 8 बसेसवर BLA चा मोठा हल्ला; तब्बल 90 सैनिक ठार
जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित, निर्माती ज्योती देशपांडे, निर्माती सौ. बेला केदार शिंदे , केदार शिंदे दिग्दर्शित झापुक झुपूक चित्रपट कौटुंबीक आणि मनोरंजनने भरपूर अशी एक धमाल लव्हस्टोरी आहे. सिनेमाची कथा नक्की काय आणि कशी असणार आहे याचा उलगडा 25 एप्रिलला सिनेमागृहातचं जाऊन बघूया.