Sushmita Sen Taali Trailer Out: “बजाएंगे नही, बजवाएंगे!…”; सुष्मिता सेनच्या ‘ताली’चा ट्रेलर प्रदर्शित

Sushmita Sen Taali Trailer Out: अभिनेत्री सुष्मिता सेनच्या (Sushmita Sen) ‘ताली’ (Taali) या वेब सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमध्ये सुष्मिता ही गौरी या ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत असल्याचे पाहायला मिळत आहे. एका व्यक्तीचा गणेश ते गौरी होण्यापर्यंतचा प्रवास ‘ताली’ या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आला आहे, असा अंदाज हा ट्रेलर बघितल्यावर लावला जात आहे.   […]

Taali teaser

Taali teaser

Sushmita Sen Taali Trailer Out: अभिनेत्री सुष्मिता सेनच्या (Sushmita Sen) ‘ताली’ (Taali) या वेब सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमध्ये सुष्मिता ही गौरी या ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत असल्याचे पाहायला मिळत आहे. एका व्यक्तीचा गणेश ते गौरी होण्यापर्यंतचा प्रवास ‘ताली’ या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आला आहे, असा अंदाज हा ट्रेलर बघितल्यावर लावला जात आहे.


‘मैं गौरी, ये कहानी मेरे जैसे कई लोगों की है. क्योंकि ये गौरी भी कभी गणेश था.’ हा डायलॉग ‘ताली’ या वेब सीरिजच्या सुरुवातीला ऐकायला मिळत आहे. ताली वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये एका व्यक्तीच्या भावना दाखवण्यात आल्या आहेत. ट्रेलरमध्ये असे दिसून येत आहे की, एका शाळेतील मुलाला सवाल विचारण्यात येतो की, ‘तुला मोठेपणी काय व्हायचं आहे? या सवलाच उत्तर तो मुलगा, ‘मला आई व्हायचं आहे’ असं देत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर वर्गातील इतर मुलं त्याच्या बोलण्यावर जोरदार हसायला सुरुवात करतात. वर्गातील शिक्षिका त्या मुलाला सांगते की, ‘पुरुष कधी आई होऊ शकत नाही’.

ताली वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये सुष्मिता सेनचा डायलॉग ऐकू येतो, ‘जिस देश में कुत्तों तक का सेंसेस होता है पर ट्रांसजेंडर्स का नहीं! ऐसे लोगों के बीच जीना, दॅट इस स्केरी..’ ताली वेब सीरिजच्या ट्रेलरला सध्या चाहत्यांनी मोठी पसंती दर्शवली आहे. ट्रेलरमधील सुष्मिताच्या अभिनयाने चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधले आहे. ताली या वेब सीरिजची चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत.

Box Office Collection: Ranveer-Aliaच्या ‘रॉकी ओर रानी की प्रेमकहानी’ने केला 100 कोटींचा आकडा पार

सुष्मिता सेननं ताली या वेब सीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ‘गौरी आली. आपल्या स्वाभिमान, आदर आणि स्वातंत्र्याची कथा घेऊन. ताली – बजाएंगे नही, बजवाएंगे!’ असे या ट्रेलरला तिनं कॅप्शन दिलं आहे. सुष्मितानं शेअर केलेल्या ट्रेलरवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा मोठ्या प्रमाणात वर्षाव करत आहेत. सुष्मिता सेनची ताली ही वेब सीरिज १५ऑगस्ट रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. या सीरिजमधील गौरीची कथा पाहण्यास चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी या सीरिजचा टीझर देखील चाहत्यांच्या भेटीला आला होता.

Exit mobile version