Swapnil Joshi : मराठी सिनेसृष्टीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करणारा सुपरस्टार अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) लवकरच नवीन भूमिकेमध्ये दिसणार आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा स्वप्नील आता आगामी ‘जिलबी’ या मराठी चित्रपटात विजय करमरकर या डॅशिंग पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
नुकतंच या चित्रपटाचे दमदार मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स (Anand Pandit Motion Pictures) निर्मित ‘जिलबी’ (Jilbi) चित्रपट 17 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या जबरदस्त चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केले आहे.
या चित्रपटात आपल्या भूमिकेबद्दल बोलताना स्वप्नील म्हणाला की, ‘पोलिसगिरी दाखवत चोख कामगिरी बजावणारा हा पोलीस अधिकारी आहे. माझ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका मला करायला मिळाल्याचा आनंद आहे. विशेष म्हणजे पोलिसांचा अंदाज, त्यांच्या जबरदस्त व्यक्तिमत्वाचा लहेजा हे सगळं करण्यात एक वेगळीच मजा आली. प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा ‘जिलबी’ हा चित्रपट आहे.
भूमिका कोणत्याही प्रकारची असली, तरी ती चांगली व्हावी यासाठी कलाकारांना कष्ट घ्यावे लागतात. एकाच प्रकारच्या भूमिकांमध्ये अडकून पडायचं नसल्याने ही वेगळी भूमिका स्वीकारली असल्याची माहिती यावेळी स्वप्नील जोशीने दिली. स्वादिष्ट जिलबी वेगवेगळ्या प्रक्रियांमधून जात असते.‘जिलबी’ हा चित्रपटसुद्धा वेगवेगळ्या चवींचा आस्वाद आपल्याला देणार आहे, ज्यात विविध व्यक्तिरेखा, त्यांचे स्वभाव वैशिष्ट्ये आणि सोब रहस्याचा थरार असं बरंच काही आहे. असं देखील स्वप्नील म्हणाला.
मित्रांना दारू पिणे आवडते अन्… MPSC च्या परीक्षेत अजब प्रश्न, तुम्हाला देता येईल का उत्तर?
‘जिलबी’ चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत. आनंद पंडित आणि रूपा पंडित हे चित्रपटाचे निर्माते आहेत. क्रिएटिव्ह दिग्दर्शन आणि सहनिर्मितीची जबाबदारी राहुल व्ही. दुबे यांनी सांभाळली आहे. छायांकन गणेश उतेकर तर कलादिग्दर्शन कौशल सिंग यांचे आहे. कार्यकारी निर्माते महेश चाबुकस्वार आहेत.