Swara Bhasker: लग्नाच्या अवघ्या ४ महिन्यातच स्वरानं दिली गुडन्यूज! 

Swara Bhasker Pregnancy: अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) प्रेग्नंट असल्याचे एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल (Viral) झाले होते. मात्र स्वरा खरच प्रेग्नंट आहे का? याबाबत एक माहिती समोर आली आहे. देशातील सामाजिक व राजकीय घडामोडींवरील रोखठोक भूमिका आणि बेधडक वक्तव्यामुळे कायम चर्चेत असणारी अभिनेत्री स्वरा भास्कर नुकतीच लग्नबंधनात (marriage) अडकली आहे. […]

Letsupp Image (52)

Swara Bhasker

Swara Bhasker Pregnancy: अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) प्रेग्नंट असल्याचे एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल (Viral) झाले होते. मात्र स्वरा खरच प्रेग्नंट आहे का? याबाबत एक माहिती समोर आली आहे. देशातील सामाजिक व राजकीय घडामोडींवरील रोखठोक भूमिका आणि बेधडक वक्तव्यामुळे कायम चर्चेत असणारी अभिनेत्री स्वरा भास्कर नुकतीच लग्नबंधनात (marriage) अडकली आहे. तिच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती.


परंतु आता त्यापाठोपाठ लग्नाच्या ४ महिन्यांमध्येच स्वरा प्रेग्नंट असल्याची चर्चा केली जात होती. परंतु आता ही बातमी लवकरच खरी ठरली गेली आहे. स्वरा आणि फहाद हे आई-बाबा होणार आहेत. नुकतीच स्वरानं खास पोस्ट शेअर करुन ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. स्वरानं सोशल मीडियावर फहाद अहमदसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे.


या फोटोला स्वरानं कॅप्शन दिले आहे, ‘कधीकधी तुमच्या सर्व प्रार्थनांची उत्तरं तुम्हाला मिळतात! धन्य, कृतज्ञ आणि उत्साही भावनांनी आम्ही नवीन जगात पाऊल ठेवले आहे. स्वरा भास्करने ही गुडन्यूज दिल्यावर अनेक सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी तिला मोठ्या प्रमाणात शुभेच्छा दिल्या आहेत. स्वरा आणि फहादच्या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

स्वराने तिच्या आणि फहादच्या लग्नाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. तिनं पोस्टमध्ये सांगितले होते की, ‘थ्री चीअर्स फॉर स्पेशल मॅरेज अॅक्ट. ते अस्तित्वात आहे आणि ते प्रेमाला संधी देते. तसेच स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत स्वरा आणि फहादचे लग्न झाले आहे, अशी माहिती स्वरानं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती.

Marriage : अभिनेत्री स्वरा भास्कर अडकली विवाह बंधनात

स्वरा आणि फहाद यांनी त्यांच्या रिसेप्शन, संगीत आणि मेहंदी सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. स्वरा तिच्या अभिनयाने कायम चाहत्यांची मनं जिंकत असते. विरे दी वेडींग, गुजारिश, तन्नू वेड्स मनू, रांझणा, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा अशा सिनेमातून स्वराच्या अभिनयाला चाहत्यांची विशेष पसंती दिली गेली आहे.

Exit mobile version