Download App

बाबुजींच्या भावसंगीताचा रंजक प्रवास, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Swargandharva Sudhir Phadke Trailer Release : स्वरगंधर्व सुधीर फडके… (Swargandharva Sudhir Phadke) मराठी घराघरांत आणि प्रत्येकाच्या मनामनात पोहोचलेले एक अजरामर नाव म्हणजे स्वरगंधर्व सुधीर फडके… मराठीसह हिंदी गायक, संगीतकार म्हणून त्यांनी संगीतप्रेमींच्या मनात एक अनोखा ठसा उमटवला. (Swargandharva Sudhir Phadke) पाच दशकांहून जास्त काळ त्यांनी आपल्या गायकीने आणि संगीताने कानसेनांना तृप्त केले. ‘गीतरामायणा’तील गोड आवाजाने, भावविभोर गीतांनी ‘बाबुजीं’नी मराठी मनावर राज्य केले. (Marathi Movie ) अशा या रसिकमनाचा ठाव घेणाऱ्या ‘बाबुजीं’ची जीवनगाथा सांगणारा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट येत्या 1 मे रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

रामनवमीच्या पूर्वसंध्येला या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा राज ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी सिनेमातील टीमसह अन्य मान्यवर मंडळींनी हजेरी लावली होती. या सोहळ्यात सिनेमातील ’गीतरामायण’मधील बहारदार गाण्यांची झलकही बघायला मिळाली. हा चित्रपट म्हणजे आजवरचा सर्वात भव्य स्वरमयी बायोपिक ठरणार असून या सिनेमाच्या निमित्ताने बाबुजी आणि त्यांच्यासोबत गायलेल्या अनेक नामवंताच्या असंख्य गाजलेल्या मधुर आणि गोड गाण्यांना चित्रपटगृहात नव्याने अनुभवण्याची पर्वणी या कलाकृतीच्या माध्यमातून दिसणार आहे. या सिनेमात एकूण 27 गाणी असून या सिनेमाच्या माध्य्मातून प्रेक्षकांना संगीत नजराणा मिळणार आहे.

सौरभ गाडगीळ प्रस्तुत रिडिफाईन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे निर्माते आहेत. सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट योगेश देशपांडे यांनी दिग्दर्शित केला असून सिनेमाची कथा, पटकथा, संवादही त्यांचेच आहेत.

Ramayana : रणबीरच्या ‘रामायण’बाबत 3 मोठी अपडेट समोर; एक नव्हे तीन भागांत…

राज ठाकरे ट्रेलरचे कौतुक सांगितले आहे की, ‘’मला बाबुजींचा सहवास फारसा लाभला नाही. परंतु माझ्या वडिलांचे आणि बाबुजींसोबतचे जवळचे संबंध होते. बाबुजींना जवळून भेटण्याचा योग आला नाही. बहुदा हा योग सुनिल बर्वेंमुळे येईल. बाबुजींची सगळीच गाणी अजरामर आहेत. त्यांच्या गाण्यांची खासियत म्हणजे एखाद्याला नवसंजीवनी देणे. उभारी देणे. मला खात्री आहे, या चित्रपटाला नक्कीच प्रेक्षकांची पसंती मिळणार आहे.

दिग्दर्शक योगेश देशपांडे सांगितलं आहे की, ‘आजचा हा दिवस खूपच आनंददायी आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला अधिकच रंगत आणली आहे. फडके आणि ठाकरे कुटुंबाचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे संगीत क्षेत्रातील योगदान सर्वश्रुतच आहे. परंतु इथंवर पोहोचण्याचा त्यांचा अनोखा प्रवास तसा खडतर होता. त्यांच्या या प्रवासात पत्नी ललिताबाई, ग. दि. माडगुळकर हे त्यांच्या सोबत होतेच. परंतु या प्रवासात त्यांना इतर अनेकांनी उत्तम साथ निभावली. त्यांच्या भावसंगीताचा हा रंजक प्रवास या सिनेमातून मांडण्याचा आमचा प्रयत्न केला आहे.

follow us

वेब स्टोरीज