Download App

Mumbai सेन्सॉर बोर्डाने लाच घेतल्याचा आरोप; अभिनेत्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Cm Eknath Shinde: तामिळ अभिनेता विशालने CBFC (सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन) मुंबईच्या अधिकाऱ्यांवर लाच घेतल्याचा आरोप केला आहे. तामिळ अभिनेता विशालने त्याच्या नुकत्याच आलेल्या ‘मार्क अँटनी’ या सिनेमाच्या हिंदी सेन्सॉर अधिकारांसाठी सेंट्रल ब्युरो ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने (CBFC) साडेसहा लाखाची लाच घेतल्याचा आरोप केला आहे.


याबद्दल विशालने सोशल मीडियावर या समस्येकडे लक्ष वेधत असतानाचा एक व्हिडिओ शेअर केल्याचे बघायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना या घटनेबद्दल कठोरपणे लक्ष घालण्यास सांगितले आहे.

अभिनेता विशालने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट शेअर करत असताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘रुपेरी पडद्यावर दाखवला जाणारा भ्रष्टाचार ठीक आहे. परंतु खऱ्या आयुष्यामध्ये हा भ्रष्टाचार पचवू शकणार नाही. विशेषत: सरकारी कार्यालयात आणि त्याही पेक्षा वाईट सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) कार्यालयामध्ये बघायला मिळत आहे.सिनेमा मंजूर होण्यासाठी साडेसहा लाख रुपये आता मोजावे लागणार आहे.

माझ्या सिनेमा मार्क अँटनीच्या हिंदी आवृत्तीकरिता अशी घटना घडल्याचा त्याने यावेळी सांगितले आहे. या सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठी साधारण ३ लाख आणि प्रमाणपत्रासाठी साडेतीन लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप लावण्यात आला आहे. तसेच माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये एकदाही अशा परिस्थितीचा सामना केला नाही. सिनेमा रिलीज झाल्यापासून संबंधित मध्यस्थला खूप जास्त स्टेक देण्याशिवाय पर्याय नसल्यची खंत त्याने यावेळी व्यक्त केला आहे.

Hardik Joshi: राणादाचा नवा चित्रपट ‘क्लब 52’ येतोय भेटीला

तसेच पुढे व्हिडीओ शेअर करत असताना विशालने सांगितले आहे की, “महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आणि माझे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ही घटना निदर्शनास आणून देत आहे. यामुळे भविष्यामध्ये अशा प्रकारे कोणत्याही निर्मात्याच्या आयुष्यात घटना घडणार नाही. माझ्या कष्टाचे पैसे गेले भ्रष्टाचारासाठी??? परंतु दुसरा मार्ग नव्हता. सर्व ऐकण्यासाठी खाली पुरावा देत आहे. तुमच्याकडून आशा आहे की, नेहमीप्रमाणे सत्याचा विजय होत असतो. पुढे विशालने ज्या दोन व्यक्तींना पैसे पाठवले आहेत, त्यांचे बँक डिटेल्स देखील शेअर क्लेलीचे बघायला मिळत आहे. आता या गंभीर घटनेबद्दल संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणार का? हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज