Tanvi Kolte’s name engraved on the Bigg Boss Marathi trophy : 11 जानेवारी 2026 रोजी बिग बॉस मराठीचा सहावा सीजन कलर्स मराठीअवर सुरू झाला आणि सुरूवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. तब्बल 100 दिवस चाललेल्या या रिऍलिटी शोचा बहुप्रतीक्षित ग्रँड फिनाले 19 एप्रिल रोजी दणक्यात पार पडला. या सीझनमध्ये टास्कमधील स्पर्धा, घरातील वाद, मैत्री आणि भावनिक क्षण यामुळे प्रत्येक एपिसोड चर्चेत राहिला. विशेष म्हणजे रितेश देशमुख यांच्या होस्टींगने शोला एक वेगळीच उंची मिळाली. भाऊचा धक्का या भागाने तर TRP मध्ये देखील झेप घेतली.
ग्रँड फिनालेच्या दिवशी टॉप 5 स्पर्धकांमध्ये तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, दीपाली सय्यद आणि विशाल कोटियान यांचा समावेश होता. प्रत्येक स्पर्धकाने आपापल्या खेळाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. यातील सर्वात महत्वाचा टर्निंग पॉईंट म्हणजे तिकीट टू फिनाले, जो तन्वी कोलते होणे जिंकला. या टास्कनंतर तिची विजेतेपदासाठीची दावेदारी अधिक मजबूत झाली. शांत, संयमी आणि स्मार्ट गेम प्लॅनमुळे तिने घरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
शेवटच्या टप्प्यात तन्वी आणि राकेश बापट यांच्या काट्याची टक्कर झाली. दोघांचाही फॅन बेस मजबूत असल्यामुळे विजेता कोण ठरणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, अखेर प्रेक्षकांच्या मतांचा कौल तन्वीच्या बाजूने लागला आणि तिने सहाव्या सिझनची ट्रॉफी जिंकली. 17 स्पर्धकांसह सुरू झालेल्या या प्रवासात वाईल्ड कार्ड एंट्रीन्नी शो अधिक रंगतदार केला. काही स्पर्धकांनी आक्रमक खेळ करत प्रेक्षकांची माने जिंकली, तर काहींनी रणनीतीचा जोरावर पुढे मजल मारली. मात्र, तन्वीने संपूर्ण सीझनभर संतुलित आणि स्थिर खेळ करत शेवटपर्यंत आपली पकड कायम ठेवली.
विजेतेपद मिळाल्यानंतर तन्वी कोलतेने आपल्या भावना व्यक्त करत प्रेक्षकांचे आणि समर्थकांचे आभार मानले. हा प्रवास सोपा नव्हता, पण प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकले, असे ती म्हणाली. दरम्यान, उपविजेता ठरलेल्या राकेश बापट याने देखील खेळाडूवृत्ती दाखवत तन्वीचे अभिनंदन केले. इतर स्पर्धकांनी देखील तिच्या खेळाचे कौतुक करत तिला शुभेच्छा दिल्या.
या सीझनमधील अनेक क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाले. टास्कमधील स्ट्रॅटेजी, भांडणं, मैत्री आणि इमोशनल क्षण यामुळे प्रेक्षकांनी या सिझनला भरभरून प्रतिसाद दिला. एकूणच बिग बॉस मराठी चा सहावा सीजन मनोरंजनाच्या परिपूर्ण ठरला. दमदार स्पर्धक, वेगवेगळे टास्क आणि उत्कंठावर्धक फिनालेमुळे हा सीजन प्रेक्षकांच्या लक्षात राहणार ठरला आहे.
